कश्मीरचे ८० बेपत्ता तरुण दहशतवादी संघटनेत ?

By Admin | Updated: September 11, 2016 20:40 IST2016-09-11T20:40:24+5:302016-09-11T20:40:24+5:30

हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीला मारला गेल्यानंतर एकीकडे काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु असतानाच कश्मीर खोऱ्यातून ८० तरुण बेपत्ता झाले आहेत

80 missing Kashmiri militant organizations missing? | कश्मीरचे ८० बेपत्ता तरुण दहशतवादी संघटनेत ?

कश्मीरचे ८० बेपत्ता तरुण दहशतवादी संघटनेत ?

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ११ : हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीला मारला गेल्यानंतर एकीकडे काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु असतानाच कश्मीर खोऱ्यातून ८० तरुण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले तरुण दहशतवादी संघटनेत दाखल झाले असतील असे खळबळजनक वृत्त समोर आले आहे.

कुख्यात दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर मोठ्या संखेने तरुण काश्मीरमधील तरुण खासकरुन दक्षिण कश्मीर मधून बेपत्ता होत आहेत. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार कश्मीरच्या चार जिल्ह्यातून (पुलवामा, कुलगाम, अनंतगान आणि शोपिंया) मागील दोन महिन्यात ८० तरुण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या तरुणांचे प्रमाण अधिकतर पुलवामा जिल्यातील आहे.

Web Title: 80 missing Kashmiri militant organizations missing?