7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खास भेट, ३२ लाख जणांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार जमा करणार २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 08:10 PM2022-01-03T20:10:13+5:302022-01-03T20:11:48+5:30

7th Pay Commission Updates: केंद्र सरकारच्या ३१ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या महिन्यात महागाई भत्ता (DA)च्या एरियरची रक्कम देण्याची शक्यता आहे. सरकार गेल्या १८ महिन्यांपासून थकीत असलेल्या डीएच्या एरियरचे एकरकमी वाटप करण्याच्या तयारीत आहे.

7th Pay Commission: Government employees will get special gifts, the central government will deposit up to Rs 2 lakh in the accounts of 32 lakh people | 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खास भेट, ३२ लाख जणांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार जमा करणार २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम  

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खास भेट, ३२ लाख जणांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार जमा करणार २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम  

Next

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या ३१ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या महिन्यात महागाई भत्ता (DA)च्या एरियरची रक्कम देण्याची शक्यता आहे. सरकार गेल्या १८ महिन्यांपासून थकीत असलेल्या डीएच्या एरियरचे एकरकमी वाटप करण्याच्या तयारीत आहे. जर असे झाले तर येणाऱ्या दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाचवेळी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळू शकते.

एका सरकारी रिपोर्टनुसार १ मार्च २०१९ रोजी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या ३१.४३ लाख एवढी होती. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे डीएचे वाटप १८ महिन्यांपासून झाले नव्हते. आता केंद्र सरकार या १८ महिन्यांच्या डीएच्या थकीत रकमेचे वाटप एकाच महिन्यात क्लीअर करण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर असे झाल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाचवेळी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळू शकते.

याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीमध्ये केला जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कंपनशेशन वाढवण्याचीही तयारी सुरू आहे. याआधी केंद्र सरकारने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये डीए आणि डीआर १७ टक्के वाढवून ३१ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.  

Web Title: 7th Pay Commission: Government employees will get special gifts, the central government will deposit up to Rs 2 lakh in the accounts of 32 lakh people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.