शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध व निराधारांना ७० लाखांचे वाटप दिवाळी गोड होणार : पाचोरा व जळगाव ग्रामीणमधील लाभार्थींना दिलासा

By admin | Updated: October 30, 2015 23:56 IST

जळगाव : शासनातर्फे ज्येष्ठ नागरिक, विधवा व निराधार नागरिकांसाठी देण्यात येणार्‍या अनुदानाचे वाटप करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिले आहे. त्या अनुशंगाने ६९ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. दिवाळीच्या काळात निराधारांना ही रक्कम मिळणार असल्याने त्यांची दिवाळी गोड आणि सुखद होणार आहे.

जळगाव : शासनातर्फे ज्येष्ठ नागरिक, विधवा व निराधार नागरिकांसाठी देण्यात येणार्‍या अनुदानाचे वाटप करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिले आहे. त्या अनुशंगाने ६९ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. दिवाळीच्या काळात निराधारांना ही रक्कम मिळणार असल्याने त्यांची दिवाळी गोड आणि सुखद होणार आहे.
पाचोरा व जळगाव ग्रामीण मतदार संघातील ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि निराधार लाभार्थ्यांचे डिसेंबर २०१४ पासूनचा पगार तांत्रिक कारणांमुळे अडकून होता. लाभार्थ्यांच्या पगाराबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी याबाबतचा आढावा घेतला. तसेच तत्काळ लाभार्थ्यांना पगार अदा करण्यात यावे असे आदेश काढले. त्या अनुशंगाने जळगाव ग्रामीणमधील डिसेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या दरम्यान दोन हजार ४८ ज्येष्ठ नागरिकांचे ३६ लाख ८६ हजार ४०० रुपये तसेच १९ विधवा महिलांचे ३४ हजार २०० रुपये जमा करण्यात आले आहे. तर मार्च ते एप्रिल २०१५ या दरम्यान दोन हजार ४८ लाभार्थ्यांचे २४ लाख ५७ हजार ६०० तर विधवा महिलांचे २२ हजार ८०० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील १२९० ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्यातील सात लाख ७४ हजार रुपये तर चार विधवा महिलांचे मार्च व एप्रिल अशा दोन महिन्याचे ४८०० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली निराधारांची पगाराची रक्कम दिवाळीच्या काळात मिळणार असल्याने निराधार लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे.