ट्रक आणि ऑटोरिक्षाची भीषण टक्कर, 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 15:38 IST2019-02-18T15:29:54+5:302019-02-18T15:38:14+5:30

भरधाव जाणाऱ्या ट्रकला ऑटोरिक्षानं टक्कर दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

6 killed in road accident in Ashoknagar district of Madhya Pradesh | ट्रक आणि ऑटोरिक्षाची भीषण टक्कर, 6 जणांचा मृत्यू

ट्रक आणि ऑटोरिक्षाची भीषण टक्कर, 6 जणांचा मृत्यू

ठळक मुद्देट्रक आणि ऑटोरिक्षाचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यूमृतांमध्ये दोन महिलांचा समावेशअपघातानंतर ट्रक चालक फरार

मध्य प्रदेश -  भरधाव जाणाऱ्या ट्रकला ऑटोरिक्षानं टक्कर दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यामधील ही दुर्घटना आहे.  ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी रोहित दुबे यांनी सांगितले की,  रविवारी रात्री जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राजकुमार, कैलाशपती, बतिबाई, शीलाबाई, बारेबाला आणि ऑटोरिक्षा चालक बंटी अशी मृतांची नावे आहेत. विवाहसोहळा आटोपून ही सर्व मंडळी घराकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा शोध घेतला आहे. 


Web Title: 6 killed in road accident in Ashoknagar district of Madhya Pradesh