पंजाबमध्ये बस उलटून ६ भाविक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 06:46 IST2026-04-16T06:46:07+5:302026-04-16T06:46:30+5:30

Punjab News: पंजाबच्या फतेहगड जिल्ह्यात भाविकांना घेऊन निघालेली एक बस उलटून झालेल्या भीषण अपघातात ६ भाविक ठार, तर २१ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

6 devotees killed as bus overturns in Punjab | पंजाबमध्ये बस उलटून ६ भाविक ठार

पंजाबमध्ये बस उलटून ६ भाविक ठार

चंडीगड - पंजाबच्या फतेहगड जिल्ह्यात भाविकांना घेऊन निघालेली एक बस उलटून झालेल्या भीषण अपघातात ६ भाविक ठार, तर २१ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आनंदपूर साहिबाचे दर्शन घेऊन हे भाविक आपल्या गावी परतत असताना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास बास्सी पठाणा भागातील मोरिंडा-चुन्नी रस्त्यावरील हिम्मतपुरा गावाजवळ हा अपघात झाला. बचाव अभियानादरम्यान जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. बैसाखीनिमित्त हे भाविक रूपनगर जिल्ह्यातील आनंदपूर साहिबा येथे दर्शनासाठी गेले होते. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस रस्त्यावरच उलटल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title : पंजाब में बस पलटने से 6 तीर्थयात्रियों की मौत, कई घायल

Web Summary : पंजाब के फतेहगढ़ में तीर्थयात्रियों से भरी बस पलटने से एक महिला सहित छह लोगों की मौत हो गई और इक्कीस घायल हो गए। हादसा मोरिंडा-चुन्नी मार्ग पर हुआ जब वे आनंदपुर साहिब से लौट रहे थे। तकनीकी खराबी का संदेह है। घायल अस्पताल में भर्ती।

Web Title : Bus Overturns in Punjab, Killing 6 Pilgrims; Many Injured

Web Summary : In Punjab's Fatehgarh, a bus carrying pilgrims overturned, killing six, including a woman, and injuring twenty-one. The accident occurred near Morinda-Chunni road as they returned from Anandpur Sahib. Technical malfunction is suspected. Injured are hospitalized.