शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ५४ लाखांची बॅग लांबवली दुचाकीस्वारावर संशय: अजिंठा चौकातील घटना

By admin | Updated: July 19, 2016 00:41 IST

जळगाव: दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्‍याची ५४ लाख रुपये असलेली बॅग लांबवली. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता अजिंठा चौकाजवळील एका टायरच्या दुकानासमोर घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव: दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्‍याची ५४ लाख रुपये असलेली बॅग लांबवली. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता अजिंठा चौकाजवळील एका टायरच्या दुकानासमोर घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल कोठारी यांचा धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी सोमवारी ते कार क्र.एम.एच.१९ बी.यु.८०८७ घेऊन जळगावात आले होते. कोठारी कार्पोरेशन, प्रणव ट्रेडर्स व प्रकाशचंद्र किसनलाल कोठारी आदी प्रत्येक नावाचे दोन असे प्रत्येकी ९ लाखांचे सहा धनादेश त्यांनी काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बॅँकेच्या मुख्य शाखेत वटविण्यासाठी जमा केले.अडीच वाजता त्या धनादेशाची एकूण ५४ लाखांची रोकड ताब्यात घेतली. ही रोकड हिरव्या रंगाच्या बॅगेत ठेवून ती बॅग कारमध्ये ठेवली. ते जामनेरला जाण्यासाठी निघाले असता आकाशवाणी चौकापासून त्यांचा पाठलाग करीत आलेल्या दुचाकीवरील दोन जणांनी त्यांना कार पंˆर झाल्याचे सांगितले. मात्र कोठारी यांनी त्याकडे दुर्लक्ष करत कार अजिंठा चौकाजवळील राजेंद्र टायर्स या पंˆरच्या दुकानावर नेली. तेथे ओळखीच्या व्यक्तीशी बोलत असतानाच त्यांच्या कारमधून ही रक्कम लांबविण्यात आली. मात्र कोठारी यांच्या ध्यानात ही बाब आलीच नाही. कारच्या मागील डाव्या बाजूचा काच फोडून सीटवरील रोकड असलेली बॅगही गायब करण्यात आलेली असल्याचे आढळून आले. हे लक्षात येताच कोठारी यांनी नजिकच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेवून तक्रार दाखल केली.