शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

30 डिसेंबरनंतर 500, एक हजाराच्या जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई?

By admin | Updated: December 26, 2016 21:17 IST

चलनातून बाद झालेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच बँकेत जमा करण्यासाठी दिलेली मुदत संपण्यास आता केवळ चार दिवसांचा अवधी उरला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 26 - नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर चलनातून बाद झालेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच बँकेत जमा करण्यासाठी दिलेली मुदत संपण्यास आता केवळ चार दिवसांचा अवधी उरला आहे. याचदरम्यान 30 डिसेंबरनंतर चलनातून बाद झालेल्या नोटा बाळगणाऱ्यांवर सरकार कडून कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. 
येत असलेल्या वृत्तांनुसार सरकार चलनातून बाद झालेल्या नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या विचारात आहे. त्यानुसार 500 आणि एक हजार रुपयांच्या दहा किंवा त्यापेक्षा कमी नोटा बाळगणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही. पण त्यापेक्षा अधिक नोटा बाळगणाऱ्यांवर 50 हजार किंवा जप्त करण्यात आलेल्या रकमेच्या पाच पट अधिक रकमेचा दंड ठोठावला जाईल.  सीएनएन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 10 हजार रुपयांपर्यंतच्या जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार नाही.  
दरम्यान, नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनटंचाईमुळे एटीएम आणि बँकांमधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती. त्यापैकी बँकांमधून रक्कम काढण्याची  मर्यादा हटवण्यात येण्याची शक्यता धुसर आहे. मात्र एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत वाढ होऊ शकते.