शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

हृदयद्रावक! वधू-वरांच्या स्वागताची जय्यत तयारी अन् मृतदेहांची लागली रांग; जोडप्यासह 11 जण चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 16:21 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका छोट्याश्या चुकीमुळे मृतदेहांची राग लागली. हा अपघात एतका मोठा होता की,  काही वेळातच पाच जणांचे मृतदेह रस्त्यावर पसरले. मृतदेहांचे तुकडे कारमध्ये अडकले, जे कसेतरी कारमधून बाहेर काढण्यात आले. अपघाताची ही भयावह दृश्ये पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. हा अपघात उत्तर प्रदेशात झाला मात्र अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोक राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रहिवासी होते.

लग्न झाल्यानंतर वधू-वरांसह नातेवाईक आपल्या घरी परतत होते. मात्र, तितक्यात संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील सुजानगढ पोलीस स्टेशन हद्दीतील तांडा गावात राहणाऱ्या राकेशचे लग्न झाले. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील रहिवासी नेहासोबत 27 वर्षीय राकेश विवाहबंधनात अडकला. या लग्नासाठी चुरूपासून गोरखपूरपर्यंत अनेक वाहनांतून वऱ्हाडी मंडळी निघाली होती. लग्न लागल्यानंतर सर्व मंडळी राजस्थानला परतत असताना अपघात झाला आणि तो दिवस अखेरचा ठरला. राकेश आणि नेहा एका कारमध्ये बसले होते, ज्यामध्ये कुटुंबातील इतर नऊ सदस्य देखील होते. तर काही जण इतर वाहनांतून नवऱ्याच्या घराकडे निघाले होते. दुसरीकडे, तांडा गावात कुटुंबातील इतर सदस्य नववधूच्या स्वागताची तयारी करत होते.  

5 जणांचा जागीच मृत्यू दरम्यान, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. उत्तर प्रदेशातून राजस्थानला परतत असताना आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर चालकाने आपले वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. काही लोक शौचालय वापरण्यासाठी खाली उतरले आणि परत बसणार होते. गाडीचा चालकही बाहेर आला होता आणि तोही गाडीच्या दिशेने जाणार होता. दरम्यान, मागून येणाऱ्या एका वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. 

याशिवाय कारमधील एका महिलेचाही मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, बाबुलाल, नेमीचंद, कैलास, राकेश, तांडा गावात राहणाऱ्या नवरदेवाचे नातेवाईक मरण पावले. कारमध्ये बसलेल्या मिथलेश या महिलेलाही आपला जीव गमवावा लागला. वधू-वरांसह कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातRajasthanराजस्थानDeathमृत्यूmarriageलग्न