शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात ५ करोड वाहन परवाने बनावट, दोषीवर होणार कडक कारवाई

By admin | Updated: May 29, 2016 15:22 IST

भारतात साधरणता प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचे वाहन परवाना बनावट असण्याची शक्यता आहे. कारण मिळालेल्या आकडीवारीनुसार रस्त्यावर जे लोग वाहन चालवतात त्यांच्यापैकी ५ करोट लांकाचे वाहन परवाने बनावट आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ : भारतात साधरणता प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचे वाहन परवाना (ड्राइविंग लाइसेंस) बनावट असण्याची शक्यता आहे. कारण मिळालेल्या आकडीवारीनुसार रस्त्यावर जे लोग वाहन चालवतात त्यांच्यापैकी ५ करोट लांकाचे वाहन परवाने बनावट आहेत. बनावट परवान्या सोबत गाडी चालवणाऱ्या चालकास एक वर्ष जेल आणि १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा नवीन कायदा करण्यातआला आहे. सध्याच्या नियमानुसार बनावट परवान्यानुसार गाडी चालवणाऱ्यास ३ महीने जेल आणि ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. 
 
१८ वर्षवयाखालील वाहन चालक असल्यास त्याच्या पालकास ३ वर्षाचा कारावास आणि २०,००० रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे गाडीचं रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात येणार आहे. देशभरात वाहन चालविण्याचे सुमारे ३० टक्के परवाने चुकीच्या पद्धतीने दिले गेले असून, ते बनावट आहेत. परवाना पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासह अपघातांना प्रतिबंध करण्याकरीचा केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते शनिवारी नागपुरच्या ट्रामा केअर इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. 
 
अनेक राज्यांत वाहन चालवण्याचे परवाने देण्याच्या पद्धतीच सदोष आहेत. बऱ्याच नागरिकांना घरबसल्या वाहन चालवण्याचे परवाने मिळाले आहेत. या प्रकारास काही अधिकारीही जबाबदार आहेत. अनेकांना नियमांनुसार वाहनेही चालवता येत नाहीत. त्याने निश्चितच अपघातांची संख्या वाढते. देशभरात सुमारे ५ हजार चालक प्रशिक्षण केंद्रे उघडण्यात येणार आहेत. येथील संगणकीय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच परवाना मिळू शकेल. तीन दिवसांत परिवहन कार्यालयांना संबंधितांना परवाना मंजूर करावा लागेल वा नाकारावा लागेल. तसे न केल्यास दोषींवर कारवाई होईल.
 
वाहन परवाने देण्याची जागतिक दर्जाची पद्धत लवकरच देशात लागू होईल असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, देशात सध्या वर्षांला ५ लाख अपघात होतात. त्यात ३ लाख नागरिकांना कायमचे अपंगत्व येते, तर सुमारे दीड लाख जण मृत्युमुखी पडतात. नक्षलवादी वा अतिरेकी हल्यात होणाऱ्या मृत्यूहूनही अपघातबळींची संख्या मोठी आहे.