१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:46 AM2024-05-08T06:46:52+5:302024-05-08T06:47:05+5:30

- सुरेश एस. डुग्गर लोकमत न्यूज नेटवर्क कुलगाम (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ...

4 militants killed in encounter with Basit Dar with 10 lakh reward | १० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार

१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार

- सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क
कुलगाम (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या चारमध्ये बासित दारचाही समावेश आहे, जो लश्कर-समर्थित दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फ्रंटचा टॉप कमांडर होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. १८ हून अधिक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता.

या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री कुलगामच्या रेडवानी भागात शोधमोहीम सुरू केली होती. मंगळवारी सकाळी चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवादी मारले. तसेच दहशतवादी लपून बसलेल्या घरात स्फोट घडवून आणले. यामुळे घराला आग लागली. 

कशी झाली चकमक?
चकमकीच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना, काश्मीरचे पोलिस महासंचालक व्ही.के. विर्दी म्हणाले की, पोलिसांना सोमवारी रात्री दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. पोलिसांनी इतर सुरक्षा दलांसह परिसराला घेराव घातला. 
मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली जी दुपारपर्यंत सुरू होती. चकमकीत बासित दार याच्यासह चार दहशतवादी ठार झाले, असे त्यांनी सांगितले. 

बासित जहाल दहशतवादी
nबासित ‘अ’ श्रेणीचा दहशतवादी 
होता. तो २०२१ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. श्रीनगर आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि अल्पसंख्याक सदस्यांवरील हल्ल्यांसह १८ हून अधिक प्रकरणांमध्ये सहभाग होता. 
nफहीम अहमद असे ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो अतिरेक्यांना मदत करणारा ग्राउंड वर्कर होता. मात्र, फहीमबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

 

Web Title: 4 militants killed in encounter with Basit Dar with 10 lakh reward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.