केंद्र-राज्यांच्या समन्वयामुळे ५४६ रुग्णालये सज्ज; रॅपीड टेस्ट कीटची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 04:54 AM2020-04-12T04:54:31+5:302020-04-12T04:54:42+5:30

रॅपिड अँटीबॉडी टेस्टचा निष्कर्ष यायला काहीसा विलंब लागेल. परंतु त्यानंतर कोरोनाचा विषाणू शरीरात आहे अथवा नाही किंवा पूर्ण बऱ्या झालेल्या रुग्णालादेखील ओळखता येईल.

4 hospitals ready for co-ordination of Central States; Waiting for Rapid Test Kit | केंद्र-राज्यांच्या समन्वयामुळे ५४६ रुग्णालये सज्ज; रॅपीड टेस्ट कीटची प्रतीक्षाच

केंद्र-राज्यांच्या समन्वयामुळे ५४६ रुग्णालये सज्ज; रॅपीड टेस्ट कीटची प्रतीक्षाच

googlenewsNext

नवी दिल्ली : केंद्र व राज्य सरकारमधील समन्वयामुळे देशभरात ५४६ रुग्णालये सज्ज झाली आहेत. केवळ कोरोना रुग्णांवरच तेथे उपचार होतील. एकूण १ लाख खाटा तयार असून आयसीयूमधील बेड्सची संख्या ११ हजार ५०० वर गेली आहे. दररोज रुग्णालयांची संख्या वाढेल. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपण अजून तयार झालोत, असा विश्वास केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी व्यक्त केला. देशातील हॉटस्पॉटमधील रहिवाशांची रॅपिड अँटीबॉडी टेस्ट केली जाईल. हॉटस्पॉटमध्ये संसर्गाचा वेग त्यामुळे कळेल.

रॅपिड अँटीबॉडी टेस्टचा निष्कर्ष यायला काहीसा विलंब लागेल. परंतु त्यानंतर कोरोनाचा विषाणू शरीरात आहे अथवा नाही किंवा पूर्ण बऱ्या झालेल्या रुग्णालादेखील ओळखता येईल. स्थानिक प्रशासन त्यानुसार धोरणात बदल करेल. अद्याप टेस्ट किट उपलब्ध नाहीत. लवकरच किट मिळतील, असा विश्वास आयसीएमआरचे शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केला.

आग्रा मॉडेल
आग्रा जिल्ह्यात सर्वात २५ फेब्रुवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना जिल्हा प्रशासनाने शोधून क्वारंटाईन केले. रूग्ण असलेला पाच किमी परिसर बफर झोन जाहीर केला. १२४८ जणांची टीम तयार केली. ९ लाख ३० हजार लोकांचे स्क्रिनिंग केले. त्यापैकी अडीच हजार लोकांना सर्दी, खोकला होता. त्यांना घरात क्वारंटाईन केले . काही जणांची चाचणी केली. ९२ रूग्ण जिल्ह्यात होते. त्यातील ५ जण बरे झाले आहेत. उरलेल्या ८७ जणांवर उपचार असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात ३८ केंद्र संवेदनशील जाहीर करून सील करण्यात आले. त्यातील दहा पुन्हा सुरू देखील झालेत. ५६६ ठिकाणे सशुल्क , ३०६० मोफत तर ४२८ कार्यालयीन क्वारंटाईन सेंटर्स निश्चित केले. त्यामुळे तेथे कोरोना आटोक्यात आल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

अहवाल नव्हे केवळ गणितीय अंदाज
आयसीएमआरच्या गणितीय अंदाजानुसार लॉकडाऊन नसते तर देशात रुग्णसंख्या वाढीचा दर ४१ टक्के असता. आतापर्यंत देशात ८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण असते. लॉकडाऊनआधी रुग्णवाढीचा दर २८.९ टक्क्यांपर्यंत गेला होता. मात्र, वेळीच लॉकडाऊन करण्यात आले, असे अगरवाल म्हणाले. मात्र हा केवळ लॉकडाऊन आधी व नंतरच्या आकडेवारीचा अंदाज आहे, अभ्यास अथवा अहवाल नाही, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

च्अँटीबॉडी टेस्ट हॉटस्पॉटमधील लोकांची केली जाईल. ज्यांना कोरोनाची लागण आहे असे व जे कोरोनातून बरे झालोे आहेत अशांना ओळखता येईल. लागण असलेल्यांवर लगेचच उपचार सुरू होईल. आरोग्य क्षेत्रात काम करणारे कोरोनातून बरे झाले असतील तरी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येईल. मात्र, पीसीआर (पॉलिमरेज चेन रिअ?ॅक्शन) चा अहवाल नकारात्मक येऊ शकतो.

च्पीसीआर हीच चाचणी सर्वात विश्वसनीय मानली जाते. या चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यास आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी पुन्हा काम करण्यास सक्षम असतील, असे गंगाखेडकर म्हणाले. आयसीएमआरने १ लाख ७१ हजार ७१८ नमुने तपासले. त्यातील १६ हजार ५६४ शुक्रवारी घेण्यात आले. रुग्णसंख्या ७४४७ वर गेली आहे. एकूण ६४२ जण बरे झाले आहेत. शुक्रवारी १०३५ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. देशात २३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यातील ४८ जण शुक्रवारी मरण पावले.
 

Web Title: 4 hospitals ready for co-ordination of Central States; Waiting for Rapid Test Kit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.