शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मक्केतील चेंगराचेंगरीत ३५ भारतीयांचा मृत्यू

By admin | Updated: September 28, 2015 02:29 IST

गत आठवड्यात मुस्लिमांच्या सर्वात पवित्र अशा हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या वाढून ३५ झाली आहे

मिना (सौदी अरब): गत आठवड्यात मुस्लिमांच्या सर्वात पवित्र अशा हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या वाढून ३५ झाली आहे. सौदी अरबमध्ये गत २५ वर्षांतील हज यात्रेदरम्यानची ही सर्वात मोठी दुर्घटना होती.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. दुर्दैवाने आणखी १३ मृतदेह भारतीयांचे असल्याची ओळख पटल्यानंतर या दुर्घटनेत मुत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या ३५ झाली आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले. मृतांमध्ये झारखंडचे मंसूरूल हुक, उत्तर प्रदेशचे अनवर आणि केरळचे एफ ए मुनीर वीतिल, अमीना बीवी, अब्दुल रहमान असरितहोदी, पी व्ही कुनहिमोन व मोईनुद्दीन अब्दुल कादिर , बिहारचे जासबुन निशा, झारखंडच्या नशिमा खातून, गुजरातचे मोहम्मद युनूस रहीमभाई मनसूरी, बीबी इस्माईल, मेहरूनिशा हनीफ, मुहम्मद युसूफ सिकंदरमियां मलीक यांचा समावेश आहे.दरम्यान सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीत ठार झालेल्यांची एकूण संख्या ७६९ वर पोहोचली असून जखमींचा आकडा ९३४ झाला आहे. जखमींमध्ये किमान १३ भारतीयांचा समावेश आहे. शाह सलमान यांनी या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक समिती गठित करण्याचा आदेश दिला आहे. हज यात्रेत १८० देशांच्या २० लाखांवर यात्रेकरूंनी भाग घेतला होता. यात भारतातून सुमारे दीड लाख भाविक गेले होते. गत ११ सप्टेंबरला मक्का येथील सर्वांत मोठ्या मशिदीत अवजड क्रेन कोसळल्याने ११ भारतीयांसह ११५ लोक ठार झाले होते. ही दुर्घटना ताजी असतानाच गत २४ सप्टेंबरला मिनात सैतानाला खडे मारण्याच्या विधीदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती.(वृत्तसंस्था)