शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अर्णब गोस्वामी यांना ३ आठवड्यांचा दिलासा; सुरक्षा देण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे पोलिसांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 16:36 IST

सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी विचारले की, इतके वकील नवीन खटल्यासाठी का आले आहेत.

ठळक मुद्देवकील  मुकुल रोहतगी अर्णबसाठी हजर झाले होते. महाराष्ट्रासाठी कपिल सिब्बल, छत्तीसगडसाठी विवेक तंखा, राजस्थानसाठी मनीष सिंघवी यांच्यासह एकूण 8 वकिलांनी सुनावणीसाठी  होती . सर्व एफआयआर एकत्र जोडा. नंतर पुढील सुनावणी पार पडेल. एकाच प्रकरणाची चौकशी बर्‍याच ठिकाणी होऊ शकत नाही.

नवी दिल्ली -  न्या. डॉ डी वाय चंद्रचूड आणि न्या. एम आर शाह यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण केली आहे. या याचिकेद्वारे त्याच्याविरोधात देशातील विविध भागात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला आव्हान देण्यात आले होते. वकील  मुकुल रोहतगी अर्णबसाठी हजर झाले होते. महाराष्ट्रासाठी कपिल सिब्बल, छत्तीसगडसाठी विवेक तंखा, राजस्थानसाठी मनीष सिंघवी यांच्यासह एकूण 8 वकिलांनी सुनावणीसाठी  होती. सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी विचारले की, इतके वकील नवीन खटल्यासाठी का आले आहेत.अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना 3 आठवड्यांचा अवधी देण्यात आला होता. म्हणजे तोपर्यंत अटक थांबविण्यात येईल. रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयाला सुरक्षा पुरवण्यासही कोर्टाने मुंबई पोलीस आयुक्तांना सांगितले आहे. अर्णब यांचे  यांचे वकील म्हणाले, नागपुरात नोंदलेली एफआयआर मुंबईत वर्ग करावा. अर्णबवरील हल्ल्याचीही एकाच वेळी चौकशी झाली पाहिजे. आमच्या कार्यालयाचेही संरक्षण झाले पाहिजे. कोर्टाने सांगितले की, आम्ही सध्या एफआयआर दाखल झालेल्या कोणत्याही कारवाईवर बंदी घातली आहे. तोपर्यंत याचिकाकर्त्यांनी त्यांच्या अर्जात सुधारणा करावीत. सर्व एफआयआर एकत्र जोडा. नंतर पुढील सुनावणी पार पडेल. एकाच प्रकरणाची चौकशी बर्‍याच ठिकाणी होऊ शकत नाही.छत्तीसगड सरकारचे वकील विवेक तंखा यांनी अर्णब गोस्वामी यांना अशी विधाने करण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यावर न्या. चंद्रचूड म्हणाले की, माध्यमांवर कोणताही अंकुश ठेवू नये. माध्यमांवर कोणत्याही प्रकारच्या बंदीला माझा विरोध आहे. त्यावर सिब्बल म्हणाले की, एफआयआर नोंदविला गेला आहे. अशा एफआयआर रद्द करता येणार नाहीत. पोलिसांना काम करू द्या. त्यावर अर्णब यांचे वकील रोहतगी यांनी त्यांच्यावरील हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. यावर कपिल सिब्बल यांनी अर्णब यांचे वक्तव्य वाचून म्हटले की, जातीयवादी हिंसाचार पसरवण्याची चर्चा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येऊ शकत नाही. अर्णब गोस्वामी यांचे वकील रोहतगी यांनी न्यायाधीशांना पालघर घटनेविषयी सांगितले. त्यावर अर्णबने त्यावर 45 मिनिटांचा कार्यक्रम केला, परंतु त्या बदल्यात अनेक राज्यात एफआयआर दाखल करण्यात आला. वकील रोहतगी म्हणाले की, सर्वत्र दाखल झालेल्या एफआयआरची भाषा सारखीच आहे. हे स्पष्ट आहे की, अर्णब यांना पद्धतशीरपणे जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयarnab goswamiअर्णब गोस्वामीNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसMumbaiमुंबई