शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

२९... सारांश

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

पुलांचे रुंदीकरण करण्याची मागणी

पुलांचे रुंदीकरण करण्याची मागणी
नरखेड : तालुक्यातील अंतर्गत मार्गावरील पूल अरुंद व खोलगट आहेत. पावसाळ्यात त्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होते. शिवाय, गावांची तालुक्याशी संपर्कही तुटतो. त्यामळे या छोट्या पुलांची दुरुस्ती करून त्यांचे रुंदीकरण करण्याची मागणी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे.
***
खड्ड्यांमुळे बळावली अपघाताची शक्यता
मेंढला : वडविहिरा - मेंढला - खराळा तसेच वडविहिरा - दावसा - थडीपवनी या दोन्ही मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता बळावली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास त्रास सहन करावा लागत असल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
***
ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई
काटोल : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. त्यामुळे पाण्याची टाकी भरण्यास विलंब होत असल्याने नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दिवसाचे भारनियमन बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
***
स्मशनभूमीत मूलभूत सुविधा तयार करा
सावरगाव : हल्ली परिसरातील गावांमधील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. तिथे पाणी, रस्ता यासह अन्य मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणचे दहन शेड मोडकळीस आले आहे. या स्मशानभूमीचे सर्वेक्षण करून तिथे मूलभूत सुविधांची निर्मिती करण्याची मागणी जोर धरत आहे.
***
सार्वजनिक विहिरी झाल्या निरुपयोगी
सावनेर : तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीपुरवठा योजना असल्याने तेथील सार्वजनिक विहिरीत देखभाल व दुरुस्तीअभावी मोडकळीस आल्या आहेत. त्या विहिरी वापरात नसल्याने उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता त्यांची दुरुस्ती करून त्यांचे रेन वॉटर हार्व्हेस्टिंगद्वारे पुनर्भरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
***
संरक्षक कठडे लावण्याची मागणी
मांढळ : कुही तालुक्यातील अनेक अंतर्गत रोडवर पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यातील बहुतांश पुलांचे संरक्षक कठडे तुटल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या पुलांचे सर्वेक्षण करून त्यावर संरक्षक कठड्यांची निर्मिती करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
***