७ राज्यांतून २६ जण राज्यसभेवर बिनविरोध; महाराष्ट्रातून शरद पवार, विनोद तावडेंसह ७ जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 05:37 IST2026-03-11T05:35:57+5:302026-03-11T05:37:41+5:30

दहा राज्यांत राज्यसभेच्या ३७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत ७ राज्यांतील २६ उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत.

26 people from 7 states elected to Rajya Sabha unopposed; 7 people including Sharad Pawar, Vinod Tawde from Maharashtra | ७ राज्यांतून २६ जण राज्यसभेवर बिनविरोध; महाराष्ट्रातून शरद पवार, विनोद तावडेंसह ७ जण

७ राज्यांतून २६ जण राज्यसभेवर बिनविरोध; महाराष्ट्रातून शरद पवार, विनोद तावडेंसह ७ जण

नवी दिल्ली : दहा राज्यांत राज्यसभेच्या ३७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत ७ राज्यांतील २६ उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे. 

बिनविरोध निवडून आलेल्या २६ सदस्यांत एनडीएचे ११ तर विरोधी पक्षांतील १५ सदस्य असून महाराष्ट्रातील   सर्वच्या सर्व सात नेत्यांचा यात समावेश आहे. त्यात राज्यातील सत्ताधारी महायुतीचे सहा सदस्य आहेत.  

अनेक राज्यांत या नेत्यांविरुद्ध विरोधी पक्षांनी उमेदवार दिले नसल्याने या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, बिहार, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांतील ११ जागांसाठी सत्ताधारी आणि विरोधी असे उमेदवार मैदानात असल्याने निवडणूक अटळ आहे. 

११ जागांसाठी १४ जण रिंगणात

बिहारच्या ५, ओडिशा ४ आणि हरियाणातील २ अशा ११ जागांसाठी १६ मार्चला मतदान होत असून यातून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन राज्यसभेत दाखल होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील बिनविरोध विजयी उमेदवार 

शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार), रामदास आठवले (रिपाइं-आठवले), विनोद तावडे, रामराव वडकुते, माया इवनाते (भाजप), ज्योती वाघमारे (शिवसेना-शिंदे), पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार).

अन्य विजयी उमेदवार

एम. थंबीदुराई (अण्णाद्रमुक), डॉ. अंबुमनी रामदास (पीएमके), ख्रिस्तोफर टिळक (काँग्रेस), राहुल सिन्हा (भाजप), बाबूल सुप्रियो (तृणमूल), अनुराग शर्मा (काँग्रेस), उपेंद्र कुशवाह (आरएलएसपी).

Web Title : 7 राज्यों से 26 राज्यसभा के लिए निर्विरोध निर्वाचित; पवार, तावड़े शामिल

Web Summary : 7 राज्यों से 26 उम्मीदवार राज्यसभा के लिए निर्विरोध चुने गए, जिनमें महाराष्ट्र से शरद पवार और विनोद तावड़े शामिल हैं। बिहार, ओडिशा और हरियाणा में 11 सीटों के लिए चुनाव अभी बाकी हैं।

Web Title : 26 unopposed to Rajya Sabha from 7 states; Pawar, Tawde included

Web Summary : 26 candidates from 7 states elected unopposed to Rajya Sabha, including Sharad Pawar and Vinod Tawde from Maharashtra. Elections are still required in Bihar, Odisha, and Haryana for 11 seats.