शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

२६ मालमत्तांचा लिलाव केव्हा? बीएचआर पतसंस्था : संचालकांच्या जळगाव, तळेगाव व शेळगावील मालमत्तांचा अहवाल पोलिसांकडे पडून

By admin | Updated: May 20, 2016 00:41 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी माजी संचालकांच्या ११८ एकर जमिनीचे तसेच काही प्लॉटच्या २६ मालमत्तांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत. जिल्हा शासनाने या मालमत्तांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनाकडे पाठविल्या अहवालावर काहीच निर्णय न झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा अहवाल धूळखात पडून आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी माजी संचालकांच्या ११८ एकर जमिनीचे तसेच काही प्लॉटच्या २६ मालमत्तांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केले आहेत. जिल्हा शासनाने या मालमत्तांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनाकडे पाठविल्या अहवालावर काहीच निर्णय न झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा अहवाल धूळखात पडून आहे.
बीएचआर पतसंस्थेला सेंट्रल रजिस्ट्रार, कृषी व सहकार विभागाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी अवसायनात काढली होती. या संस्थेतील संचालक मंडळाने असुरक्षित कर्जाचे वाटप केले होते. त्या कर्जाच्या वसुलीची अडचण निर्माण झाली आहे. अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सन २००८ ते २०१३ व अवसायकांनी पदभार घेईपर्यंतच्या संचालक मंडळाची यादी काढली. असुरक्षित कर्जाची वसुली होण्यासाठी व ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी या संचालकांच्या मालमत्तांचा शोध घेत अवसायकांनी इंटनेटद्वारे माजी संचालकांच्या २६ मालमत्तांचा शोध घेतला. या मालमत्तांचा एकत्रित अहवाल तयार करीत एमपीआयडी ॲक्ट नुसार कारवाई करण्यात यावी यासाठी दोन महिन्यांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल पाठविला आहे.
प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे जाणार
अवसायकांनी पाठविलेल्या ४७ हेक्टर २४ आर जमिनीचा तसेच काही प्लॉटचा एकत्रित अहवाल हा जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेतर्फे पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर या मालमत्तांची आर्थिक गुन्हा शाखेमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत मिळावे यासाठी शासनाकडे अहवाल पाठविणार आहे.

उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी नियुक्ती
महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ४ नुसार जर शासनाला खात्री पटली असेल की, कुठल्याही वित्तीय संस्था ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे किंवा ठेवीवर अधिक व्याज देण्याचे आश्वासन आणि इतरही लाभ देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची शक्यता नाही. अशा वित्तीय संस्थांच्या रकमा अथवा मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार शासनाला आहे. त्यानुसार शासन उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करीत असतात. नियुक्त अधिकारी यांना ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी संस्थेच्या व संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्या विक्री करण्याचे अधिकार असतात.