२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:30 IST2025-04-30T12:29:34+5:302025-04-30T12:30:32+5:30
Teacher run away with student: पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची पालकांनी शिक्षिकेकडे कोचिंग क्लास लावलेला होता. तो क्लासला गेला, पण परत आलाच नाही. आता चार दिवसांपासून पोलीस शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत.

२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
Teacher Student News: २३ वर्षांची शिक्षिका आणि ११ वर्षांचा विद्यार्थी, दोघेही पळून गेले आहेत. चार दिवस झाले पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण, दोघांचाही अद्याप ठावठिकाणा सापडलेला नाही. गुजरातमधील सूरत शहरात हा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्याला घेऊन फरार झालेल्या शिक्षिकेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही खंगाळून काढले. त्यातील एका व्हिडीओमध्ये शिक्षिका विद्यार्थ्यासोबत जाताना दिसत आहे. शिक्षिकेच्या एका हातात सामानाची मोठी ट्रॉली बॅग आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूरतमधील पुणे परिसरात ही घटना घडली आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. शुक्रवारी (२५ एप्रिल) ११ वर्षाचा विद्यार्थी क्लाससाठी गेला होता. तेव्हापासून परतलाच नाही.
वाचा >>मुलांचे 'आधार' असे करा अपडेट, १५ वर्ष पूर्ण झाल्यावर अपडेट करणं आवश्यक
पोलिसांनी ट्यूशन टीचरच्या घरी जाऊन चौकशी केली, तर ती घरी नसल्याचे कळले. त्यानंतर त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत जाताना दिसत आहे. शिक्षिकेच्या हातात एक ट्रॉली बॅग आहे. विद्यार्थ्याच्या पाठीवर शाळेची बॅग असल्याचे दिसत आहे.
शिक्षिका विद्यार्थ्यासोबत कशी झाली फरार?
पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर तपासाला वेग दिला आहे. तीन दिवस झाले पोलिसांनी शहरातील सगळीकडे त्यांच्या शोध घेतला. चार पथके त्यांच्या शोधासाठी स्थापन करण्यात आली आहेत.
शिक्षिका आणि विद्यार्थी बसने गेले की, कुठल्या खासगी वाहनाने याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी शहरातील खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीची मदत घेतली जात आहे. रिक्षा किंवा कुठल्या तरी खासगी वाहनाने शिक्षिका फरार झाली असा संशय पोलिसांना आहे.
विद्यार्थ्यासोबत पळून जाण्याआधी खरेदी केली ट्रॉली बॅग
पोलिसांनी केलेल्या तपासात अशी माहिती समोर आली आहे की, शिक्षिकेने पळून जाण्याआधी एक ट्रॉली बॅग खरेदी केली होती. २३ एप्रिल रोजी ही बॅग खरेदी करण्यात आली. बॅग खरेदी केल्यानंतर काही तासांनी शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन फरार झाली. विद्यार्थ्याला घेऊन पळून जाण्याचा प्लॅन शिक्षिकेने आधीच ठरवला होता, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.