शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

बँकांकडून २,१६७ खेळाडूंना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 01:45 IST

राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तूर्तास खेळाडूंच्या कोट्यातून भरती करण्यात आलेले २,१६७ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ५५९ अधिकारी आणि १,६०८ कनिष्ठ कर्मचारी आहेत.

नवी दिल्ली : राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तूर्तास खेळाडूंच्या कोट्यातून भरती करण्यात आलेले २,१६७ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ५५९ अधिकारी आणि १,६०८ कनिष्ठ कर्मचारी आहेत. सर्वात मोठी बँक या नात्याने स्टेट बँक आॅफ इंडियात (एसबीआय) सर्वाधिक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध बँकांतर्फे खेल अकादमी आणि स्पर्धा प्रायोजित केल्या जातात. काही बँका खेळाडूंना शिष्यवृत्तीही देतात. यासंदर्भात प्रत्येक बँकेचे स्वत:चे धोरण आहे. कोट्यातून नियुक्ती मिळालेल्या खेळाडूंना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुविधा मिळतात.सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वसामान्यपणे उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेळाडूंची भरती केल्या जाते,असे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, यामध्ये अधिकारी, लिपिक आणि कनिष्ठ कर्मचारी पदांवर नियुक्ती केली जाते. स्टेट बँक आॅफ इंडियात खेळाडू कोट्यातून सद्यस्थितीत २१४ अधिकारी आणि २०६ कनिष्ठ कर्मचारी कार्यरत आहेत. युनियन बँक आॅफ इंडियात २००, विजया बँकेत १४५, बँक आॅफ महराष्ट्रमध्ये १२२, बँक आॅफ इंडियात १०३ आणि बडोदा बँकेत ९० कर्मचारी आहेत. (प्रतिनिधी)चार बँकांनी उघडले नाही खातेउपलब्ध आकडेवारीनुसार भारतीय स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत दोन कोटी दोन लाख रुपये खर्च केले तर एसबीआयच्या तुलनेत लहान असतानाही पंजाब नॅशनल बँकेने ३ कोटी २८ लाख रुपये खर्च केले. बँक आॅफ महाराष्ट्रच्या वतीने आतापर्यत ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. पण यूको बँक, युनायटेड बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ म्हैसूर आणि भारतीय महिला बँकेने मात्र यावर्षी अद्याप खेळांवर एकही पैसा खर्च केला नाही.