शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

धक्कादायक! 11 वर्षात 20,500 जणांना रक्ताच्या संक्रमणातून HIV ची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 10:50 AM

एकच इंजेक्शन अनेकांसाठी वापरल्यामुळे 20 जणांचा एचआयव्हीची लागण झाल्याची घटना ताजी असताना आता एचआयव्हीसंबंधी आणखी एका धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देगुजरातमध्ये पाचपैकी एका रुग्णाला रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्ही झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1,134 जणांना रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्हीची बाधा झाली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात बोगस डॉक्टरने एकच इंजेक्शन अनेकांसाठी वापरल्यामुळे 20 जणांचा एचआयव्हीची लागण झाल्याची घटना ताजी असताना आता एचआयव्हीसंबंधी आणखी एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार 2007 पासून आतापर्यंत रक्ताच्या संक्रमणासतून 20,592 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. राष्ट्रीय एडस नियंत्रण संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आरोग्य क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. 

गुजरातमध्ये पाचपैकी एका रुग्णाला रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्ही झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1,134 जणांना रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्हीची बाधा झाली आहे. राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेच्या आयसीटीसी सेंटर्सशी संबंधित असलेल्या रुग्णांनी दिलेल्या माहितीतून हा डाटा तयार करण्यात आला आहे. सर्वांनाच रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्हीची लागण झालीय असे म्हणता येणार नाही अनेकदा आपली चूक लपवण्यासाठी रुग्ण रक्त संक्रमणाचे कारण देतात असे तज्ञांनी सांगितले. 

रक्तपेढीकडे चौथ्या पिढीचा एलिसा टेस्टिंग किट नसेल तर रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्ही होण्याची शक्यता असते असे डॉक्टरांनी सांगितले. सरकारी केंद्रामध्ये तिस-या पिढीचे किट वापरले जातात. ज्यामध्ये आठ ते 12 आठवडयांनी एचआयव्हीचे इंफेक्शन ओळखण्याची क्षमता असते. चौथ्या पिढीचे एलिसा किट चौथ्या आठवडयातच एचआयव्हीचे इंफेक्शन ओळखू शकतात. रक्तदान शिबिरामध्ये काहीवेळा एचआयव्ही बाधितही रक्तदान करतात. आपल्याला हा आजार आहे याची त्यांना माहितीही नसते. 

काय घडले उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेशात उन्नावमध्ये एका डॉक्टरने जास्त पैसे कमवायचा नादात 20 जणांचा जीव धोक्यात टाकला आहे. बांगरमऊ तहसीलमध्ये एका बोगस डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून सायकलीवर फिरून लोकांवर उपचार करतो आहे. धक्कादायक म्हणजे हा झोलर डॉक्टर प्रत्येक रूग्णासाठी एकाच इजेंक्शनचा वापर करतो. बोगस डॉक्टरच्या या प्रतापामुळे तेथील 20 लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे.  

टॅग्स :Healthआरोग्य