शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

2020 पर्यंत ईशान्य भारतातील सर्व राज्ये रेल्वेने जोडली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 12:31 PM

ईशान्य भारताचे स्थान लक्षात घेता येते वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने येत्या दोन वर्षांमध्ये ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये रेल्वेची सुविधा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सुमारे 90 हजार कोटी रुपये खर्च करुन ईशान्य भारतातील रेल्वेसेवेचे जाळे अधिक दृढ चांगले बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेशातील 795 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचाही समावेश आहे. यामुळे चीनच्या सीमेपर्यंत भारतीय नागरिकांना आणि लष्कराला वाहतूक करणे सोपे जाणार आहे. त्याबरोबरच बोगीबील हा अरुणाचल प्रदेश व आसाम यांना जोडणारा ब्रह्मपुत्रेवरील पूल लवकरच खुला होणार आहे. या पुलामुळेही रेल्वेला अरुणाचल प्रदेशात सेवा देणे सोपे जाणार आहे. आसाम , अरुणाच प्रदेश आणि त्रिपुरा सध्या रेल्वेने जोडली गेले आहेत. मात्र मिझोरम, मेघालय, मणिपूर, सिक्किम, नागालँड या राज्यांच्या राजधान्या रेल्वेने जोडल्या गेल्या नाहीत. भैराबी आणि सायरंग या 51.38 किमी लांबीच्या मार्गाने मिझोरमची राजधानी ऐजॉल जोडण्यात येणार आहे. सायरंग हे ऐजॉलपासून 18 किमी अंतरावर आहे. त्याचबरोबर सिक्किमची राजधानी गंगटोकला जाण्यासाठी रांगपो या गावापर्यंत रेल्वे नेण्यात येणार आहे. रांगपोपासून गंगटोक 40 किमी अंतरावर आहेयब्यारनिहाट ते शिलाँग या मेघालयातील रेल्वेमार्गाचे काम खासी विद्यार्थी संघटनेच्या विरोधामुळे बंद पडले आहे. या प्रदेशात जमिन अधिग्रहणासाठी रेल्वेला अद्याप ना हरकत प्रमामपत्र मिळालेले नाही. खासी हिल्स अटोनोमस डिस्ट्रीक्ट कौन्सीलने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही.

सिवोक ते रांगपो या ४४ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या सिक्किममध्ये सुरु आहे. तो पूर्ण होण्याआधीच पाक्योंग  येथे विमानतळ बांधण्यात आला आहे. त्यामुळे सिक्किमवासियांना विमानसेवा आणि रेल्वेसेवा एकापाठोपाठ एक मिळत आहेत. सिक्किम हे एकमेव राज्य होते की ज्यामध्ये आजवर विमानतळ नव्हता. पाक्योंग विमानतळ हा भारत चीन सीमेजवळ असल्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उडान योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले पाक्योंग हे विमानतळ भारतातील 100 वे विमानतळ ठरले आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेnorth eastईशान्य भारतIndiaभारतsikkimसिक्किमTripuraत्रिपुराArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशAssamआसाम