शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

१९... सारांश

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

३० तरुणांनी केले रक्तदान

३० तरुणांनी केले रक्तदान
खापरखेडा : सिल्लेवाडा येथे भाजप कार्यकर्ते व आयुष ब्लड बँके च्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केेले होते. त्यात ३० तरुणांनी रक्तदान केले. यावेळी छाया ढोले, पंचफुला पंडागडे, आकाश भुरकुंडे, सूरज गुप्ता, जगदीश कैथवास, परमानंद दुबे, रामानंदन गुप्ता, रोहित सूर्यवंशी यांच्यासह अन्य तरुणांनी रक्तदान केले.
***
खापरखेड्यात वारकरी मेळावा
खापरखेडा : स्थानिक वॉर्ड क्रमांक - २ मध्ये शुक्रवारी वारकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात धनंजय मेटे, विठ्ठल साबळे, विलास झिल्लारे, रामकृष्ण ताकोटे, पांडुरंग बारापात्रे यांचे प्रवचन होणार आहे. सकाळी पालखी प्रभातफेरी काढण्यात येईल. सदर मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***
मुरमाचे ढिगाऱ्यामुळे वाहतुकीस अडसर
मेंढला : वडविहिरा-वाढोणा मार्गाच्या दुरुस्तीसाठी या मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात मुरमाचे ढिगारे टाकण्यात आले आहे. हा मार्ग आधीच अरुंद असल्याने या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीस अडसर निर्माण होत आहे. रोडच्या दुरुस्तीला सुरुवात करून मुरमाची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
तलावातील पाणी दूषित
धर्मापुरी : रेवराळ येथील गावतलावात सांडपाणी सोडले जाते. शिवाय, त्यात कपडे धुतले जात असून, जनावरेही साफ केली जातात. पूजेच्या साहित्याचेही याच तलावात विसर्जन केले जाते. त्यामुळे या तलावातील पाणी दूषित झाले आहे. या प्रकाराला आळा घालून तलावाची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
रेवराळ येथे धार्मिक कार्यक्रम
मौदा : तालुक्यातील रेवराव येथे मानव धर्म सेवक संमेलनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडले. गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांना आरोग्य स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झााले होते.
***
मौदा - महालगाव बससेवा सुरू करा!
कोदामेंढी : मौदा-तांडा-महालगाव या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास खासगी प्रवासी वाहनांनी प्रवास करावा लागतो. हा प्रवास जीवघेणा असल्याने या मार्गाची दुरुस्ती करून बससेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
***