शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१९... गुन्हे... जोड

By admin | Updated: February 20, 2015 01:09 IST

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
डोंगरगाव शिवारातील अपघात : वाहनचालकाचा शोध सुरू
नागपूर : भरधाव वाहनाने रोडच्या कडेने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यास उडविले. यात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात सोमवारी सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.
दिवाकर बाबूराव चचाने (५५, रा. डोंगरगाव, ता. कुही) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. दिवाकर हा रोडच्या कडेने पायी जात असताना त्याला अज्ञात भरधाव वाहनाने उडविले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी कुही पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
वृद्धाचा मृतदेह आढळला
कुही : कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकोली शिवारात सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
गणेश रामचंद्र गाढवे (६०, रा. आकोली, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. गणेश गाढवे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या आकोली शिवारातील शेतात गेले होते. दरम्यान, रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळू शकले नाही. या प्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***
येरखेडा येथे घरफोडी
नागपूर : कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू येरखेडा येथे घरफोडी झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
फिर्यादी नविता जितेंद्र तिरपुडे (३६, न्यू येरखेडा, ता. कामठी) या बाहेरगावी गेल्याने घरी कुणीही नव्हते. चोरट्यांनी हीच संधी साधून घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी आलमारीत ठेवलेले तीन हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***