शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१९... गुन्हे

By admin | Updated: February 20, 2015 01:09 IST

कोंढाळी येथून बोलेरोची चाके लंपास

कोंढाळी येथून बोलेरोची चाके लंपास
कोंढाळी : घरासमोर उभ्या असलेल्या बोलेरोची पाच चाके आणि बॅटरी चोरट्यांनी काढून लंपास केल्याची घटना कोंढाळी येथील कुंभारपुरा येथे रविवारी मध्यरात्री घडली.
फिर्यादी शेख इकबाल शेख इलाही (४२, रा. कोंढाळी, ता. काटोल) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-३५/के-२००५ क्रमांकाची बोलेरा नेहमीप्रमाणे घरासमोर उभी ठेवली होती. दरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्री या वाहनाची चार चाके व एक स्टेपनी तसेच बॅटरी काढूून चोरून नेली. या साहित्याची एकूण किंमत २८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप लांबट करीत आहे.
***
दूध विक्रेत्यास लुटले
खापरखेडा : सायकलने दूध विकायला गेलेल्या विक्रेत्यास लुटल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्लेवाडा परिसरात रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. यातील आरोपीस अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बसेश्वर चंद्रशेखर तंबाखे (७३, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे दूधविक्रेत्याचे नाव असून, गुड्डू ऊर्फ रंगिला सुंदर कुरील (रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बसेश्वर हे शेतकरी असून, ते दूध विक्रीचा व्प्यवसाय करतात. ते रविवारी सकाळी सायलवर दुधाच्या कॅन ठेवून जात असताना आरोपी गुड्डूने त्यांना सिल्लेवाडा परिसरात अडविले आणि त्यांच्याकडून ५०० रुपये हिसकावून पळ काढला. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ३९२ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली.
***
रिधोरा शिवारातून टाटासुमो पळविली
काटोल : चोरट्यांनी टाटासुमो पळविल्याची घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधोरा (सातगाव) शिवारात सोमवारी मध्यरात्री घडली.
फिर्यादी सेवकू शामराव जीवतोडे (४०, रा. सातगाव, ता. काटोल) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-३४/के-७२१३ क्रमांकाची टाटा सुमो रिधोरा (सातगाव) शिवारात उभी ठेवली होती. दरम्यान, चोरट्यांनी ती चोरून नेली. या टाटासुमोची किंमत दोन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***