शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

१८९ जलसिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे हायकोर्टाचे आदेश

By admin | Updated: December 25, 2015 02:58 IST

जनहित याचिका : अनियमितता झाल्याचा ठपकाऔरंगाबाद : महाराष्ट्रात एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात आलेला नसताना राज्य शासनाने २००७ ते २०१३ या कालावधीत मंजुरी दिलेल्या १८९ जलसिंचन प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे स्पष्ट करीत या प्रकल्पांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनास दिले.जलसिंचन अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी दाखल ...


जनहित याचिका : अनियमितता झाल्याचा ठपका

औरंगाबाद : महाराष्ट्रात एकात्मिक जल आराखडा तयार करण्यात आलेला नसताना राज्य शासनाने २००७ ते २०१३ या कालावधीत मंजुरी दिलेल्या १८९ जलसिंचन प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे स्पष्ट करीत या प्रकल्पांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनास दिले.
जलसिंचन अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले. प्रा. पुरंदरे यांनी २०१४ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत राज्याचा एकात्मिक जलआराखडा तयार करण्याचे आदेश राज्य शासनास द्यावेत. हा आराखडा का तयार करण्यात आला नाही, याबाबत चौकशी करण्याची व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेवर जुलैमध्ये सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने जलआराखडा तयार होईपर्यंत नवीन प्रकल्पांना मंजुरी न देण्याचे आदेश दिले होते. जलआराखडा तयार नसताना १८९ प्रकल्पांना राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्यात यावा, असेही आदेशात नमूद केले होते.
न्यायालयाच्या आदेशापासून नवीन सर्व प्रकल्पांच्या मान्यता थांबविण्यात आल्या होत्या. त्यानंतर १८९ प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा अहवाल शासनाने नुकताच न्यायालयात सादर केला. त्यानंतर या याचिकेवर न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए. आय. एस. चिमा यांच्यासमोर सुनावणी झाली. राज्य शासनाकडून महाधिवक्ते श्रीहरी अणे, तर प्रा. पुरंदरे यांच्याकडून ॲड. प्रवीण शहा यांनी बाजू मांडली.
१८९ प्रकल्पांपैकी ४८ प्रकल्पांचे काम सुरू झालेले नसताना ते सुरू असल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात भूसंपादनाच्या अडचणींमुळे प्रकल्प खोळंबलेले आहेत. त्यातील अनेक प्रकल्पांवर खर्चही करण्यात आलेला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. (प्रतिनिधी)
-------------------------
अकोला जिल्ह्यातील कांचनपूर प्रकल्पाला शासनाने २६ जून २००९ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली. त्याच दिवशी कामाची निविदा काढण्यात आली आणि दोन महिन्यांत प्रकल्पाच्या कार्यारंभाचे आदेश ठेकेदारास देण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. या सर्व प्रकाराची न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
----------------------