शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१७ दुर्लक्षित रोग; तोंड देण्यासाठी हवी मदत

By admin | Updated: February 20, 2015 02:12 IST

डेंग्यू, ताप, कुष्ठरोग आणि निद्रानाशासह दुर्लक्षित १७ उष्णकटिबंधीय रोगांना तोंड देण्यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करावी, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

जिनेव्हा : डेंग्यू, ताप, कुष्ठरोग आणि निद्रानाशासह दुर्लक्षित १७ उष्णकटिबंधीय रोगांना तोंड देण्यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करावी, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.जगभरात दरवर्षी या रोगांमुळे ५ लाख लोक दगावतात. जगभरातील १४९ देशांतील तब्बल दीड अब्ज लोक या रोगांनी ग्रस्त आहेत. या रोगांचा मुकाबला करण्यासाठी अतिरिक्त गुंतवणूक केल्यास अनेकांचा जीव वाचविता येईल. तसेच अनेकांच्या नशिबी येणारी विकलांगता आणि यातनाही दूर होतील. याशिवाय या रोगापासून मुक्ती मिळाल्यास उत्पादकतेतही सुधारणा होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.देशो-देशींच्या सरकारने यासाठी भरीव गुंतवणूक केल्यास मानवांच्या हालअपेष्टा कमी होतील. आर्थिक लाभाचे वाटेकरी करून गरिबीच्या विळख्यातून जनतेची सुटका करता येईल, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे सरसंचालक मार्गारेट चॅन यांनी केले आहे.दुर्लक्षित १७ उष्णकटिबंधीय रोगासंबंधीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या खात्याचे प्रमुख असलेले डर्क एंजेल्स यांनी जिनेव्हा येथे पत्रकारांना सांगितले की, आफ्रिकेतील लोक मोठ्या संख्येने या रोगांनी त्रस्त आहेत. उप-सहारा आफ्रिकेतील ४५० दशलक्ष जनतेचे जीवन या रोगांमुळे धोक्यात आहे. लॅटिन अमेरिका, मध्य-पूर्व, मध्य आशिया आणि आशियातही या रोगांचा फैलाव झालेला आहे. एवढेच नाहीतर युरोपीय देशांसोबत जपान आणि अमेरिकेत हे रोग आढळू शकतात. या रोगांचा प्रतिकार आणि उपचार करण्यासाठी २०२० पर्यंत वर्षाकाठी २.९ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. (वृत्तसंस्था)या रोगांचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने अनेक देशांनी पावले उचलली आहेत. २०१३ मध्ये जगभरात निद्रानाशाचे ६,३१४ रुग्ण होते. गेल्या तीन दशकांत वर्षाकाठी या रुग्णांची संख्या आटोक्यात राखण्यात यश आले. नारू, कुष्ठरोग रुग्णांची संख्याही कमी करण्याकामीही प्रगती झाली आहे. तथापि, दाहक पुरळ या रोगाचा मुकाबला करण्यात फारशी प्रगती झालेली नाही. जिवाणू संसर्गापासून होणाऱ्या या रोगाचे निर्मूलन करणाऱ्या मोहिमेसाठी कैवारी मिळायला हवा. या रोग निर्मूलन करणारी मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे जरूरी आहे, असे डर्क एंजेल्स म्हणाले.