शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

देशात दरवर्षी कॅन्सरचे १५ लाख नवे रुग्ण, दरवर्षी ८ लाख लोकांचा होत आहे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:28 IST

२०१६ ते २०१८ या काळात २३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक ८ लाख १ हजार ३७४ कॅन्सरपीडितांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशात कॅन्सरचे रुग्ण दरवर्षी वेगाने वाढत आहेत. दरवर्षी १५ लाख लोक कॅन्सरच्या विळख्यात सापडत आहेत. मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८ लाख प्रतिवर्ष झाली आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिसून येत आहेत.आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले की, २०१६ ते २०१८ या काळात २३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक ८ लाख १ हजार ३७४ कॅन्सरपीडितांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला आहे. चौबे यांनी लोकसभेत सांगितले की, केवळ २०१८ मध्ये कॅन्सरपीडितांची संख्या ४३ लाख ६३ हजार आहे. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, २०१८ मध्ये कॅन्सरचे १५ लाख ८६ हजार ५७१ रुग्ण नोंद झाले आहेत.

याशिवाय वर्ष २०१७ मध्ये १५ लाख १७ हजार आणि वर्ष २०१६ मध्ये १४ लाख ५१ हजार रुग्ण समोर आले आहेत. सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात आढळून आले आहेत. त्यानंतर कॅन्सरपीडितांची सर्वाधिक संख्या बिहार आणि महाराष्ट्रात आहे. कॅन्सरवरील उपाययोजनांबाबत चौबे यांनी सांगितले की, राष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण कार्यक्रम १९७५ मध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानंतर याला राष्ट्रीय कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग नियंत्रण कार्यक्रम बनविण्यात आले. याअंतर्गत लवकरात लवकर निदान, उपचार यासाठी देशात जिल्हा स्तरावर ६१६ क्लिनिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी ३,८२७ क्लिनिक स्थापन करण्यात आले. याशिवाय केमोथेरपीसाठी २१४ डे केअर केंद्रे बनविण्यात आली आहेत.रोगावर मात करण्यासाठी उपाययोजनाकॅन्सरच्या तिस-या स्टेजच्या देखभालीसाठी एक योजना सुरू करण्यात आली आहे. यानुसार १९ राज्य कॅन्सर संस्था आणि २० कॅन्सर केंद्रांची स्थापना करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.याशिवाय पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत एम्स आणि दुसºया संस्थांमध्येही शास्त्रीय अभ्यासावर लक्ष दिले जात आहे. हरयाणात राष्ट्रीय कॅन्सर संस्था आणि कोलकात्यात चितरंजन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचा विकास करण्यात येत आहे.

टॅग्स :cancerकर्करोगIndiaभारतHealthआरोग्य