१३ वर्षांचा जीवन संघर्ष थांबला, देशातील पहिले दयामरण; हरीश राणाने घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 05:58 IST2026-03-25T05:50:59+5:302026-03-25T05:58:01+5:30

देशात दयामरणाची अनुमती मिळालेले पहिले व्यक्ती ठरलेल्या हरीश राणा याची दिल्लीतील एम्समध्ये प्राणज्योत मालवली.

13 year struggle for life ended india first euthanasia harish rana bids farewell to the world | १३ वर्षांचा जीवन संघर्ष थांबला, देशातील पहिले दयामरण; हरीश राणाने घेतला जगाचा निरोप

१३ वर्षांचा जीवन संघर्ष थांबला, देशातील पहिले दयामरण; हरीश राणाने घेतला जगाचा निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशात दयामरणाची अनुमती मिळालेले पहिले व्यक्ती ठरलेल्या हरीश राणा याची मंगळवारी दिल्लीतील एम्समध्ये प्राणज्योत मालवली. गेल्या १३ वर्षांपासून कोमात असल्याने त्याला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. ताे पंजाब विद्यापीठामध्ये बी. टेकचे विद्यार्थी होता. 

२०१३मध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ताे कोमात गेला. ३१ वर्षीय राणा याला दयामरण द्यावे, असा सर्वोच्च न्यायालयाने ११ मार्च रोजी ऐतिहासिक निर्णय दिला. रुग्णाला हळूहळू मृत्यू येईल, अशा पद्धतीनं जीवनरक्षक प्रणाली हटवा, अशा सूचना न्यायालयानं एम्सला दिल्या होत्या. त्याचे दिल्ली एम्सने पालन केल्यानंतर हरिश राणा याची प्राणज्योत मालवली. 

 

Web Title : भारत में पहली निष्क्रिय इच्छामृत्यु: 13 साल के संघर्ष के बाद हरीश राणा का निधन

Web Summary : भारत में निष्क्रिय इच्छामृत्यु पाने वाले पहले व्यक्ति हरीश राणा का दिल्ली एम्स में निधन हो गया। 2013 में गिरने के बाद 13 वर्षों से कोमा में थे, सुप्रीम कोर्ट ने उन्हें इच्छामृत्यु की अनुमति दी थी। अदालत के आदेश के बाद लाइफ सपोर्ट हटा दिया गया, जिससे उनकी पीड़ा समाप्त हो गई।

Web Title : India's first passive euthanasia: Harish Rana passes away after 13-year struggle.

Web Summary : Harish Rana, India's first passive euthanasia recipient, died at Delhi AIIMS. Comatose for 13 years after a fall in 2013, the Supreme Court granted him euthanasia. Life support was removed, following court orders, ending his prolonged suffering.