शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

१२६ कोटी केव्हा मिळणार?

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

रस्त्यांची दुरुस्ती रखडली : बांधकाम समिती सदस्यांचा प्रश्न

रस्त्यांची दुरुस्ती रखडली : बांधकाम समिती सदस्यांचा प्रश्न
नागपूर : वर्षभरापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळे नादुरुस्त झालेल्या जिल्ह्यातील ८०३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सरकारकडे १५८ कोटींची मागणी केली होती. परंतु ३२ कोटी मिळाले. यातून जेमतेम ४५ रस्त्यांची कामे झालेली आहेत. उर्वरित १२६ कोटी केव्हा मिळणार असा प्रश्न सोमवारी बांधकाम समितीच्या बैठकीत माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्यासह सदस्यांनी उपस्थित केला.
२०१३-१४ या वर्षात रस्ते दुरुस्तीसाठी ३२ कोटींचा निधी मिळाला. यातून ४५ कामे पूर्ण करण्यात आली. १५२ कामे सुरू आहेत परंतु उर्वरित ६०५ कामे रखडलेली आहेत. पुढील पावसाळ्यापर्यंत ती दुरुस्त होण्याची शक्यता नाही. रस्ते नादुरुस्त असल्याने ग्रामीण भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकांना त्रास होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले.
१० कोटी ४० लाखांच्या निविदा स्वीकृत करण्यात आल्या आहेत. या कामाचे कार्यादेश देण्यात आले. यात रस्ते बांधकाम व दुरुस्ती, तीर्थक्षेत्र विकास, अंगणवाडी बांधकाम व आरोग्य विभागाच्या कामांचा समावेश असल्याची माहिती उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी दिली. जि.प.मार्फत करण्यात येणाऱ्या कामाच्या निविदा काढण्याला विलंब लागतो. यासाठी अल्पमुदतीच्या निविदा काढण्याची शासनाने अनुमती द्यावी, असा प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली. सदस्य दुर्गावती सरियाम, कमलाकर मेंघर, अंबादास उके, नंदा नारनवरे, शांताराम मडावी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चौकट...
आराखड्यात कामांचा समावेश करा
रस्ते विकास आराखडा २००१-२१ मध्ये जि.प.सर्कलमधील अनेक रस्त्यांचा समावेश नाही. ते समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
चौकट...
४० कोटींची मागणी
रस्ते दुरुस्तीसाठी बांधकाम समितीने ग्राम विकास विभागाकडे ४० कोटीची मागणी केली आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर यातून रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहे.