शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

स्पेक्ट्रमचा विक्रमी लिलाव पूर्ण निविदेच्या ११५ फेऱ्या : सरकारला मिळणार १.१० लाख कोटी

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव १९ दिवसानंतर बुधवारी पूर्ण झाला. विक्रमी बोलींमुळे सरकारच्या खजिन्यात सुमारे १.१० लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. दूरसंचार स्पेक्ट्रममधील चार बँडसाठी निविदांच्या एकूण ११५ फेऱ्या पार पडल्या, हे विशेष.

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव १९ दिवसानंतर बुधवारी पूर्ण झाला. विक्रमी बोलींमुळे सरकारच्या खजिन्यात सुमारे १.१० लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. दूरसंचार स्पेक्ट्रममधील चार बँडसाठी निविदांच्या एकूण ११५ फेऱ्या पार पडल्या, हे विशेष.
बोलींची एकूण किंमत १,०९,८७४ कोटी एवढी होती. रिलायन्स जिओसारख्या नव्या कंपन्या स्पर्धेत उतरल्याने एअरटेल आणि व्होडाफोनसारख्या प्रस्थापित कंपन्यांनी आक्रमक बोली लावत प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून आले. आठ ऑपरेटर्सनी बोली लावण्यात आघाडी घेतल्याने काही सर्कलमध्ये दोन स्पेक्ट्रम बँडच्या किमती दुपटीने वाढल्या. २०१० मध्ये १,०६,००० कोटी रुपयांची बोली लागली होती. त्यात बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांचा वाटा ३० हजार कोटींचा होता. यावेळी या दोन्ही कंपन्या वगळून अन्य कंपन्यांकडूनच उपरोक्त पैसा मिळणार असल्याचे दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.
--------
लक्ष सुप्रीम कोर्टाकडे
लिलावप्रकरणी एक याचिका प्रलंबित असून सवार्ेच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर दूरसंचार विभाग यशस्वी बोली लावणाऱ्यांबाबत संपूर्ण तपशील आणि निकाल जाहीर करेल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले असतानाच सवार्ेच्च न्यायालय आज गुरुवारी निर्णय देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लिलावाची मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक याचिका दाखल आहेत.
---------
कॉलरेट वाढणार?
स्पर्धा शिगेला पोहोचल्याने ऑपरेटर्सकडून चढ्या किमतीच्या बोली लावण्यात आल्याचा परिणाम मोबाईल आणि फोनच्या कॉलचे दर, एसएमएस आणि डाटा शुल्क वाढण्यात होऊ शकतो. उद्योगातील आर्थिक परिस्थिती आणि किमतीची संरचना पूर्णपणे बदलू शकते; कारण त्याचा परिणाम कॉलचे दर वाढण्यात होऊ शकतो, असे सीओएआय या उद्योग मंडळाचे महासंचालक राजन एस. मॅथ्यू यांनी म्हटले. सर्व मोठ्या कंपन्या कर्जबाजारी असून स्पेक्ट्रमच्या रूपात कच्च्या मालाचे दर वाढल्याचे पाहता त्यांच्याकडे फोनसेवांचे दर वाढविण्याखेरीज पर्याय उरणार नाही, असे एयूएसपीआयचे माजी सरचिटणीस एस.सी. खन्ना यांनी म्हटले.