शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये दारूबंदी समर्थनार्थ ११,२९२ किलोमीटर लांबीची मानवी साखळी

By admin | Updated: January 22, 2017 00:45 IST

राज्य सरकारने केलेल्या दारूबंदीला पाठिंबा देण्यासाठी आणि जनजागृती घडवून आणण्यासाठी बिहारमधील दोन कोटी विद्यार्थी व स्त्री-पुरुष यांनी शनिवारी ११ हजार २९२ किलोमीटर लांबीची

- एस. पी. सिन्हा, पाटणा

राज्य सरकारने केलेल्या दारूबंदीला पाठिंबा देण्यासाठी आणि जनजागृती घडवून आणण्यासाठी बिहारमधील दोन कोटी विद्यार्थी व स्त्री-पुरुष यांनी शनिवारी ११ हजार २९२ किलोमीटर लांबीची मानवी शृंखला तयार केली. ही जगातील सर्वात मोठी मानवी साखळी होती, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले. दारूबंदी समर्थनाच्या मानवी साखळीला संपूर्ण बिहारमधून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता.मुख्यमंत्र्यांबरोबरच सर्व मंत्री, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालुप्रसाद यादव, विधानसभा व विधान परिषदेचे पीठासीन अधिकारी तसेच सर्व आमदार हेही मानवी साखळीत एकमेकांचे हात धरून उभे असल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय राज्याचे मुख्य सचिव, अन्य सचिव तसेच प्रशासनातील आणि पोलीस खात्यातील ज्येष्ठ अधिकारीही त्यात होते. इतकेच नव्हे, तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी, पक्षाचे प्रवक्ते शहानवाज हुसेन, राम कृपाल यादव यांनीही सिवानमध्ये मानवी साखळीमध्ये भाग घेतला. आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थनार्थ नव्हे, तर दारूबंदीला पाठिंबा देण्यासाठी मानवी साखळीमध्ये सहभागी झालो आहोत, असे शहानवाज हुसेन यांनी सांगितले. मध्यंतरी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे दारूबंदीबद्दल नितीश कुमार यांचे कौतुक केले होते. बहुधा त्याचमुळे भाजपा नेते व कार्यकर्ते मानवी साखळीमध्ये सहभागी झाल्याची चर्चा इथे होती.गिनीज बुकमध्ये नोंद११ हजार २९२ किलोमीटरची मानवी साखळी आतापर्यंत कोणीच पाहिलेली नाही. त्यामुळे या साखळीची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल. या मानवी साखळीची छायाचित्रे टिपण्यासाठी इस्त्रोने भारतीय आणि परदेशी तीन सॅटेलाइट्सचा वापर केला. त्याखेरीज ४0 ड्रोन आणि चार विमानांद्वारे या साखळीचे चित्रिकरण केले.