शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षमय आयुष्यातही न खचता १०५ वर्षीय आजीने दिली चौथीची परीक्षा; रचला 'हा' इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 16:55 IST

या कठीण संघर्षातून उभं राहतात भागीरथी यांनी घर संसार सांभाळलं मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

दिल्ली - सर्व शिक्षा अभियान हे देशभरात व्हायरल झालेल्या शिक्षणाच्या टॅगलाइनला विशेष महत्व आहे. शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही वयाचं बंधन नसतं. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही शिक्षण घेऊ शकता. याचचं उदाहरण पाहायला मिळालं आहे केरळच्या भागीरथी अम्मा यांच्याकडे पाहून. लहानपणापासून शिक्षणाची गोडी असणाऱ्या भागीरथी यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. 

केरळमध्ये राज्य साक्षरता अभियानद्वारे चौथी वर्गाच्या परीक्षेत भागीरथी यांनी सहभाग घेतला होता. माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी नेहमी शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहत होती. मात्र लहानपणी आईचा मृत्यू झाला, त्यानंतर घरातील भावंडाची जबाबदारी माझ्यावर आली त्यामुळे माझं स्वप्न अपूर्ण राहिलं. 

या कठीण संघर्षातून उभं राहतात भागीरथी यांनी घर संसार सांभाळलं मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. वयाच्या ३० व्या वर्षी भागीरथी यांच्या पतीचा मृत्यू झाला. घरातील मुलाबाळांचा सांभाळ करणं त्यांच्यासमोर आव्हान बनलं होतं. आयुष्यातील या संघर्षमय प्रवासात शिक्षणापासून त्यांना लांब राहावं लागलं. मात्र उतारवयात त्यांना पूर्ण अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. भागीरथी यांनी चौथीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. 

पीटीआयच्या वृत्तानुसार साक्षरता मिशनचे निर्देशक पीएस श्रीकला यांनी सांगितले की, भागीरथी आम्मा या केरळ साक्षरता अभियानातील आतापर्यंतच्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे जे शिक्षण घेत आहेत. भागीरथी आम्मा यांना लिहिण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. मात्र त्यांच्या मुलीने यासाठी त्यांना मदत केली. पर्यावरण, गणित आणि मल्ल्याळम असे पेपर त्यांनी दिले. 

भागीरथी आम्मा यांना परीक्षा देताना अतिशय आनंद झाला. वयाच्या ९ व्या वर्षी भागीरथी आम्मा यांनी तिसरीत असताना शिक्षण सोडलं. इतक्या मेहनतीने शिक्षण घेत असलेल्या भागीरथी आम्माकडे आधारकार्ड नाही त्यामुळे त्यांना विधवा पेन्शन अथवा ज्येष्ठ नागरिक पेन्शनही मिळत नाही. मागच्या वर्षी ९६ वर्षाच्या कार्तियानी आम्मा यांनी साक्षरता अभियानात सर्वात जास्त मार्क मिळविले होते. त्यांना १०० पैकी ९८ गुण मिळाले होते.  

टॅग्स :Educationशिक्षणKeralaकेरळ