शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात 10% पदे राखीव, गृह मंत्रालयाची मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 20:05 IST

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Agnipath Scheme :केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेबाबत (Agnipath Scheme) गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. यावरुन विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने माजी अग्निवीर जवानांसाठी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबलची 10 टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, त्यांना शारिरीक चाचणीत शिथिलता दिली जाणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितल्यानुसार, अग्निवीराने आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्याला सीआयएसएप, बीएसएफ, सीआरपीएफ, आरपीएफ यांसारख्या केंद्रीय सशस्त्र दलात नोकरीची संधी दिली जाईल. त्यांच्यासाठी 10 टक्के पदे राखीव ठेवली जातील आणि शारीरिक चाचणीतदेखील शिथिलता दिली जाईल. 

याबाबत बीएसएफचे डीजी नितीन अग्रवाल म्हणाले, माजी अग्निवीर जवानांकडे चार वर्षांचा अनुभव असेल. ते पूर्णपणे शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित असतील. बीएसएफसाठी हे खूप उपयुक्त ठरेल. छोट्या प्रशिक्षणानंतर त्यांना देशाच्या सीमेवर तैनात केले जाईल. तर, CISF च्या डीजी नीना सिंह यांनी सांगितले की, सीआयएसएफनेही यासंदर्भात सर्व तयारी केली आहे. CRPF चे डीजी अनिश दयाल सिंह यांनीदेखील भरती प्रक्रीयेची सर्व व्यवस्था केल्याचे सांगितले. शिवाय, अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला CRPF च्या वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत दिली जाईल, असेही ते म्हणाले.

एसएसबीचे डीजी दलजित सिंग यांनी म्हटले की, आमच्या दलात अग्नीवीरांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या तुकडीसाठी 5 वर्षांची सूटही दिली जाईल. तसेच, त्यांना कोणतीही शारीरिक चाचणी द्यावी लागणार नाही. याशिवाय, आरपीएफचे महासंचालक मनोज यादव म्हणाले की, भविष्यात रेल्वे संरक्षण दलातील कॉन्स्टेबल पदासाठीच्या सर्व भरतींमध्ये माजी अग्नीवीरांना 10 टक्के आरक्षण असेल. माजी अग्नीवीरांना दलात घेताना आरपीएफ खूप उत्साही आहे. 

अग्निपथ योजनेचा वाद14 जून 2022 रोजी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. अग्निपथ योजनेत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी सैन्यात नोकरी दिली जाईल. यातील 25 टक्के अग्निवीरांना पुढील 15 वर्षांसाठी कायम ठेवले जाईल. सध्या सरकारने याची वयोमर्यादा 23 वर्षे केली आहे. दरम्यान, या योजनेवरुन विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत.  नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधकांनी अग्निपथ योजनेवरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस