शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By admin | Updated: September 30, 2016 02:39 IST

२७०२ लेखाशीर्ष निधी प्रकरण : मात्र पदरी निराशा?

नाशिक : जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी परस्पर जलयुक्त शिवार अभियानाकडे वर्ग करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी (दि.२९) जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व गटनेत्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा निधी वर्ग न करण्याबाबत निवेदन दिले.दरम्यान, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतरही शिष्टमंडळाच्या पदरात आश्वासनाशिवाय प्रत्यक्ष ठोस काही निर्णय पडला नसल्याचे समजते.गुरुवारी सकाळीच अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध सभापती व विविध पक्षांचे गटनेते यांनी संयुक्तरीत्या विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. त्यात जिल्हा परिषदेस सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी आदिवासी व बिगर आदिवासी योजनेंतर्गत २७०२ लेखाशीर्षांतर्गत लघुपाटबंधारे विभागाला नियतव्यय मंजूर झाला आहे. मंजूर नियतव्ययांमधून कामांचे दायित्व वजा जाता शिल्लक अनुदानातून दीडपट मर्यादेस लघुपाटबंधारे विभागाच्या कामांना मान्यता दिल्या आहेत. परंतु जिल्हा परिषदेला जिल्हाधिकारी कार्यालयाचे एक पत्र प्राप्त झाले असून त्यात २७०२ लेखाशीर्ष योजनेतून संपूर्ण निधी जिल्ह्णातील जलयुक्त शिवार योजनेकडे वर्ग करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हे पत्र म्हणजे जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हक्कावर अतिक्रमण केल्याची भावना जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झाली असून, त्यामुळेच दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या हक्काचा निधी वर्ग करण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)