शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

प्री- वेडिंग शूटसाठी तरुणाईचा ग्रामीण भागाकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 15:32 IST

देवगांव : लग्नाच्या गोड आठवणींचा सोहळा आठवणीच्या स्वरुपात जपण्यासाठी कॅमेर्‍यात कैद केला जातो. परंतु हल्लीच्या जमाना फास्ट झाल्याने लग्नापूर्वीच्या आठवणीदेखील कॅमेर्‍यात बंदिस्त करण्यासाठी नवा पर्याय प्री-वेडिंग शूटची पध्दत सुरु झाली आहे.

ठळक मुद्देकोरोना सावट : आर्थिक मंदीमुळे फोटोग्राफीसाठी ग्रामीण भागाची निवड

देवगांव : लग्नाच्या गोड आठवणींचा सोहळा आठवणीच्या स्वरुपात जपण्यासाठी कॅमेर्‍यात कैद केला जातो. परंतु हल्लीच्या जमाना फास्ट झाल्याने लग्नापूर्वीच्या आठवणीदेखील कॅमेर्‍यात बंदिस्त करण्यासाठी नवा पर्याय प्री-वेडिंग शूटची पध्दत सुरु झाली आहे.

या प्री- वेडिंगसाठी तरुणाईकडून ग्रामीण भागातील परीसराला पसंती दिली जावू लागली आहे. देवगांव परिसरातील वैतरणा धरणाच्या निसर्गरम्य ठिकाणी अशा फोटोग्राफीला वाव मिळत आहे.
कारोनाच्या परिस्थितीमुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे लग्नसराईचा गत हंगाम ठप्प झाला होता. याकाळात छोटेखानी लग्नसोहळे पार पडताना दिसले. परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असलेल्या विवाह समारंभाबाबत तरुणाईचा उत्साह वाढला आहे.

कोरोनोमुळे संपूर्ण जग बदलून गेले आहे. विवाह सोहळ्याच्या पद्धती बदलल्या आहेत. कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न होत असल्याने खर्चात मोठी बचत होत आहे. त्यामुळे वधुवरांची ह्यप्री वेडिंगह्ण फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगला पसंती वाढली आहे.
शहरी भागातील वधुवरांकडून फोटोग्राफी व शूटिंगसाठी ग्रामीण भागातील शेती, नदी, नाले, तळे आणि पुरातन महाल व वाडे यांच्या लोकेशनला जास्त पसंती दिली जात आहे. तसेच, पुरातन महाल व वाड्यांनाही पसंती दिली जाते. काहींना ग्रामीण भागातील शेतातील पिकांमध्ये फोटोग्राफी करायला आवडते. त्यामुळे सध्याच्या मंदीच्या काळातही खासगी मालकी असलेल्या महाल व राजवाडे मालकांना आणि ग्रामीण भागातील रिसोर्टला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

सध्या विवाह सोहळा एका विधीपुरता मर्यादित न राहता, लग्नाच्या आधीच्या क्षणांचा आनंद साठवून ठेवण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. भावी वधू-वराच्या पहिल्या भेटीपासून ते एकमेकांच्या विवाह सोहळ्यापर्यंतचे सर्व क्षण पुन्हा अनुभवून साठवण्यासाठी प्री-वेडिंग शूट केले जात आहे. म्हणजेच लग्न ठरल्यावर दोघे पहिल्यांदा कधी भेटले, कुठे भेटले, लग्नासाठी कुणी पहिल्यांदा विचारले? यासारख्या आठवणी कॅमेर्‍यात साठवल्या जात आहेत. त्यामुळे पहिल्या भेटीपासून ते लग्न ठरण्यापर्यंतचा प्रवास कॅमेर्‍यामध्ये बंदिस्त करण्याचा पर्याय तरुणाईने निवडला आहे.


प्री-वेडिंग काय असतं?
या शूटवेळी फोटो फ्रेम्स, फुगे, छत्री, बाईक, सायकल, गाडी तसेच लग्नाची तारीख लिहिलेल्या पाट्या असे विविध प्रॉप्स वापरले जातात. फोटो काढत असताना त्याचे चित्रीकरणही केले जाते. ज्याचे रूपांतर ह्यप्री-वेडिंगह्ण व्हिडिओमध्ये होते. प्री -वेडिंगच्या माध्यमातून जोडपे एकमेकांना अधिक ओळखू लागतात, असे सांगितले जाते.

धरण किनाऱ्यावर प्री- वेडिंग फोटोग्राफी करतांना जोडपे.

टॅग्स :Wedding Cha Shinema Movieवेडिंग चा शिनेमाRural Developmentग्रामीण विकास