ट्रॅक्टर उलटल्याने युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:20 IST2019-05-19T00:18:51+5:302019-05-19T00:20:12+5:30
भरधाव ट्रॅक्टर अचानकपणे उलटल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना वाडीवºहे शिवारातील मुरंबी रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ट्रॅक्टर उलटल्याने युवक ठार
नाशिक : भरधाव ट्रॅक्टर अचानकपणे उलटल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना वाडीवºहे शिवारातील मुरंबी रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जगदीश नंदलाल जाट (३०) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. जाट शनिवारी (दि.१८) ट्रॅक्टरने प्रवास करताना हा अपघात झाला. भरधाव ट्रॅक्टर मुरंबीरोडने जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. अपघातात जगदीश ट्रॉलीखाली दाबला गेला. त्यास गंभीर दुखापत झाल्याने प्रदीप विश्वनाथ सिंग यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले.