Youth killed in motorcycle collision | दुचाकींच्या धडकेत युवक ठार
दुचाकींच्या धडकेत युवक ठार

पंचवटी : हिरावाडीतील त्रिकोणी बंगलामार्गे कालिकानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पल्सर दुचाकी मोटारसायकल चालकाने समोरून येणाºया दुसºया दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात दुचाकीचालकाविरु द्ध पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि.१६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सचिन रामचंद्र सुमराव (३१) कालिकानगरकडे जाण्यासाठी त्याच्या दुचाकीने वळण घेत असताना समोरून भरधाव आलेल्या पल्सर दुचाकीचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत सचिनच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की सचिन रस्त्यावर फेकला गेला. त्याच्या डोक्यास व जबड्याला गंभीर दुखापत झाली. जखमी सचिनवर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मयत सचिनचा चुलतभाऊ शुभम विठोबा सुमराव (२६) याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात पल्सरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर पल्सर दुचाकीस्वाराने घटनास्थळी थांबून जखमीला मदत करण्याऐवजी पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


Web Title: Youth killed in motorcycle collision
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.