"तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर", धार्मिक विधीसाठी बोलवून अशोक खरातने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:49 IST2026-03-24T15:43:24+5:302026-03-24T15:49:02+5:30

अशोक खरात याने एका महिलेवर आधी अत्याचार केले. तिला माझ्या लग्न कर म्हणत भीती घातली. इतकेच नाही, तर तिच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. 

"Your future is linked to me, marry me", Ashok Kharat said while calling her for the religious ceremony... | "तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर", धार्मिक विधीसाठी बोलवून अशोक खरातने...

"तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर", धार्मिक विधीसाठी बोलवून अशोक खरातने...

Ashok Kharat News: राज्यभर खळबळ उडविणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातलैंगिक शोषण प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण लागले आहे. खरातने एका महिलेला धार्मिक विधी करायचा असे सांगून बोलावून घेतले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

अशोक खरात याने फेब्रुवारी २०२० पासून आरोपीने महिलेला एकांतात बोलावून धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.  

अशोक खरातकडून अनेक वेळा बलात्कार

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक खरात याने 'तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर' असे सांगत तिच्यावर दबाव टाकला. मे २०२२ मध्ये आरोपी खरातने कार्यालयात बोलावून मंतरलेले पाणी पाजून असाच अत्याचार केला. 

यानंतरही अनेक वेळा अशाच प्रकारे अत्याचार करण्यात आले. 'यासंदर्भात कुणाला सांगितले तर तुझे व तुझ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल' अशी धमकीवजा भीती घालून आरोपी अशोक खरात याने गप्प बसवले, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

अत्याचार केला आणि गोळ्या देऊन गर्भपात केला

अन्य एका पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार विकृत अशोक खरात याने तिचा विवाह झाल्यानंतरही वारंवार बळजबरी केली तसेच त्यानंतर गोळ्या देऊन गर्भपातही केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. 

३३ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात हजर राहून तिच्यासोबत घडलेल्या अत्याचारांची आपबिती कथन केली. त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. 

२०१३ मध्ये विवाह जुळविण्याच्या काळात तिच्या कुटुंबीयांनी ओळखीच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून खरातचा सल्ला घेतला होता. तेव्हा खरातने स्वतःला ज्योतिषी व अवतारी पुरुष भासवून संबंधित महिलेचा विश्वास संपादन केला. 

विवाहानंतरही कौटुंबिक अडचणींवर उपाय सांगण्याच्या नावाखाली तो संपर्कात राहिला. लग्न मोडल्यानंतर दुसरे लग्न करण्यासाठीही खरातने पुन्हा महिलेला बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला.

Web Title : "मुझसे शादी करो, तुम्हारा भविष्य मुझसे जुड़ा है," अशोक खरात का कहना है।

Web Summary : अशोक खरात, एक स्व-घोषित धर्मगुरु, पर नए आरोप लगे हैं। उसने एक महिला को धार्मिक अनुष्ठानों के लिए बुलाया और कथित तौर पर उसके साथ बलात्कार किया, शादी का वादा किया और बोलने पर उसके परिवार को धमकी दी। एक अन्य पीड़िता ने शादी के बाद जबरन गर्भपात का आरोप लगाया।

Web Title : "Marry me, your future is tied to me," says Ashok Kharat.

Web Summary : Ashok Kharat, a self-proclaimed godman, faces new allegations. He lured a woman for religious rituals and allegedly raped her, promising marriage and threatening her family if she spoke out. Another victim accused him of forced abortions after marriage.