शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठच्या रस्त्यावर तरुणाईचा पुन्हा उन्माद

By admin | Updated: October 11, 2015 23:31 IST

गस्तीचा अभाव : पोलीस ठाण्यांच्या हद्दी बदलल्याचा ‘लाभ’

नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गोदाकाठलगतचा मखमलाबाद-आनंदवली जोडरस्ता पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट झाल्याने तरुणाईचा उन्माद या रस्त्यावर पुन्हा दिसू लागला आहे.मद्यधुंद होऊन रविवारी (दि.११) संध्याकाळी पावसात भिजत तरुणांनी या रस्त्यावर बेभान होऊन उन्माद केला. शिव्यांची लाखोली वाहून दुचाकी वेगात नेऊन रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फेकून ‘रोड-शो’ केला. संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी नदीकाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी तरुणाईच्या उन्मादावर तीव्र नाराजी दर्शविली. तरुण-तरुणी भरधाव वेगाने दुचाकी-चारचाकी दामटवित होते, तर काहींनी रस्त्याच्या कडेला चारचाकी उभ्या करून साउंड सिस्टिमचा दणदणाट करून धूम्रपान-मद्यपान करत नाचण्याचा प्रतापही केला. तरुणाईच्या वाढत्या उन्मादाने जेरीस आलेल्या काही जागरूक नागरिकांनी यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता ‘आता तो रस्ता आमच्या हद्दीत राहिलेला नाही’ असे उत्तर कानी पडल्याचे काही ज्येष्ठांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. एकीकडे व्हॉट्सअ‍ॅप सेवेच्या माध्यमातून पोलीस जनतेच्या जवळ जाण्याचा व सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे जनतेच्या तक्रारींना ‘हद्दी’च्या वादात टोलविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आल्याने काहींनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, एका उच्चाधिकाऱ्यांची मोटारही या रस्त्यावरून थेट आनंदवलीकडे मार्गस्थ झाली, तरीदेखील त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला नाही हे विशेष! पोलिसांच्या निळ्या दिव्याची मोटार येत असल्याचे बघून बेभान तरुणांनी काही मिनिटे भानावर आल्याचे भासविण्याचा प्रयत्नही केला. एकूणच हद्द बदलल्याचा लाभ बेभानपणे उन्माद करणाऱ्या तरुणांना होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.