आयशरच्या  धडकेत युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:02 IST2021-01-04T01:01:32+5:302021-01-04T01:02:00+5:30

सिन्नर शिर्डी मार्गावर सायाळे फाटा येथे अज्ञात  आयशर टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार यवकाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. 

Young man killed in Eicher attack | आयशरच्या  धडकेत युवक ठार

आयशरच्या  धडकेत युवक ठार

सिन्नर/पाथरे : सिन्नर शिर्डी मार्गावर सायाळे फाटा येथे अज्ञात  आयशर टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार यवकाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. 
सिन्नर तालुक्यातील मलढोण येथील मच्छिंद्र भागवत डुबे (३५) हा ऊसतोड कामगार कोळपेवाडी येथून दुचाकीने पाथरेमार्गे मलढोणकडे येत असताना, समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो ने जोरदार धडक दिल्याचे प्रथमदर्शनीने पाहिले. 
त्यानंतर, सदर टेम्पो फरार झाला. या अपघातात दुबे याचा जागीच मृत्यू झाला.  दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार  दशरथ मोरे, नितीन जगताप तपास करीत आहेत. 

Web Title: Young man killed in Eicher attack