शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

योगनिद्रेने जीवनाची दिशा बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:53 IST

योगनिद्रा ही पूर्ण शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक विश्रांती घेण्याची पद्धती आहे. त्यामुळे योगनिद्रा करताना व्यक्ती झोपला आहे असे वाटतो, मात्र तो अंतर्गतरीत्या तो सजगतेच्या खोलवर कार्यरत असतो. अशा स्थितीत निद्रा आणि जागरण अवस्थांवर संवेदना आणि असंवेदना यांच्याशी संपर्क होत असल्याने योगनिद्रेच्या माध्यमातून मानवी जीवनाची दिशा बदलणे शक्य असल्याचे प्रतिपादन स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी केले.

ठळक मुद्देस्वामी शिवराजानंद सरस्वती : भारत योग यात्रा योगोत्सवाचा उत्साहात समारोप

नाशिक : योगनिद्रा ही पूर्ण शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक विश्रांती घेण्याची पद्धती आहे. त्यामुळे योगनिद्रा करताना व्यक्ती झोपला आहे असे वाटतो, मात्र तो अंतर्गतरीत्या तो सजगतेच्या खोलवर कार्यरत असतो. अशा स्थितीत निद्रा आणि जागरण अवस्थांवर संवेदना आणि असंवेदना यांच्याशी संपर्क होत असल्याने योगनिद्रेच्या माध्यमातून मानवी जीवनाची दिशा बदलणे शक्य असल्याचे प्रतिपादन स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी केले.शहरात तीन दिवसापासून सुरू असलेल्या स्वत:ला वाचा योगोत्सव भारत योग यात्रा २०१९ चा रविवारी (दि.१०) योगनिद्रेच्या प्रात्यक्षिकाने समारोप करण्यात आला. योगोत्सवाच्या अखेरच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात स्वामी शिवराजानंद सरस्वती तसेच स्वामी कैवल्यानंद सरस्वती यांनी सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम यांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. योग शिकायचा असेल ते मुंगेर बिहार, सेवा करायची असेल तर रिखिया झारखंड येथील आश्रमास भेट देण्याचे आवाहन स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी यावेळी केले.समाधीच्या उच्च अवस्थेपर्यंत जाण्याचा मार्गयोगनिद्रा ही एक प्रभावशाली प्रणाली आहे ज्याद्वारे आपण चेतन रुपात शिथिल होण्यास शिकता. लोक सोफ्यावर बसून टीव्ही बघतात किंवा वृत्तपत्र वाचतात तेव्हा त्यांना वाटते की ते विश्रांती घेत आहेत, मात्र विश्रांतीची वैज्ञानिक व्याख्या फार व्यापक असून पूर्ण विश्रांतीसाठी आपण सजग असणे महत्वाचे आहे. क्रियात्मक निद्रेची अवस्था म्हणजेच योग निद्रा. योगनिद्रा, एकाग्रता आणि समाधीच्या उच्चस्तरीय अवस्थेपर्यंत जाण्याचा मार्ग प्रशस्त करीत असल्याचे स्वामी शिवराजानंद यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकYogaयोग