शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विश्व जलशांती यात्रा काढणार

By admin | Updated: July 1, 2015 01:41 IST

विश्व जलशांती यात्रा काढणार

नाशिक : जगाला पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, जलसाक्षरतेचा जागर करण्यासाठी प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे उद्यापासून (दि. १) विश्व जलशांती यात्रा काढणार असून, तब्बल पाच वर्षे चालणाऱ्या या यात्रेचा प्रारंभ नाशकातून होणार आहे. डॉ. सिंह उद्या नाशकात वृक्षारोपण करून यात्रेसाठी जर्मनीकडे रवाना होणार आहेत.जलसंकटामुळे ओसाड झालेल्या राजस्थानमधील काही गावांत हिरवाई फुलवणाऱ्या डॉ. सिंह यांनी हाच वसा जगाला देण्यासाठी या विश्वयात्रेचे आयोजन केले आहे. यासंदर्भात डॉ. सिंह म्हणाले, जेथे पाणी असते, तेथे सुख-समृद्धी वास करते. त्यामुळे जगामध्ये जलसाक्षरता वाढवण्याची गरज आहे. त्यातून जलयुद्धाऐवजी जलशांती निर्माण होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर आपण पुढील पाच वर्षे जगभरात भ्रमंती करणार असून, पहिला दौरा जर्मनीचा केला जाईल. तेथील दहा-बारा शहरांना भेटी दिल्यानंतर आपण भारतात परत येऊ. त्यानंतर इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्या आमंत्रणावरून इंग्लंडच्या दौऱ्यावर जाऊ. तेथे थेम्स नदीला आलेल्या पुरासाठी आपल्या सूचनांनुसार उपाययोजना सुरू आहेत. या दौऱ्यात त्यांची पाहणी केली जाईल. त्यानंतर स्टॉकहोम, स्वीडन अशा अनेक देशांचे दौरे करून तेथील लोकांना नद्यांचे महत्त्व पटवून देणार आहोत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला नाशकातून प्रारंभ करीत आहोत. नीर, नदी व नारी यांचा सन्मान हा कुंभमेळ्याचा मूळ उद्देश होता; मात्र कालौघात तो हरवला. येत्या कुंभमेळ्यात लोकांना हा खरा अर्थ पटवून देण्याची चांगली संधी आहे. ‘ग्रीन कुंभ’ या संकल्पनेची मुहूर्तमेढ नाशकातून करून देशापुढे आदर्श निर्माण करण्याची गरज आहे, असेही डॉ. सिंह म्हणाले.