शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षितता कार्यशाळेत उपस्थितीचा विश्वविक्रम

By admin | Updated: January 20, 2017 00:58 IST

अशोका बिल्डकॉनला बहुमान : २७०० नागरिकांनी नोंदविला सहभाग

नाशिक : रस्ता सुरक्षिततेविषयी वाहनचालकांसह नागरिकांध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने अशोका बिल्डकॉन यांनी एकाच वेळी २७०० नागरिकांमध्ये जनजागृती करून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. गुरुवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या कार्यक्रमातील उपस्थितींची ‘गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.‘रस्त्याने दूरवर जाण्यासाठी घ्या सुरक्षित धडे’ या अनोख्या कार्यक्रमात नागरिक, विद्यार्थी असे सर्व घटक सहभागी झाले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वाहतूक नियम पालनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी दृकश्राव्य सादरीकरणातून विविध उदाहरणे आणि व्हिडीओंचेही सादरीकरण करण्यात आले. तसेच अशोका बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख यांच्या हस्ते अ‍ॅण्ड्रॉइड ‘अशोक रोड सेफ्टी अ‍ॅप’च्या निर्मितीची संकल्पना स्पष्ट करून अशोका समूहातील प्रत्येक घटकाने आपल्या भ्रमणध्वनीमध्ये हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्याचे आवाहन के ले. तसेच रस्ता सुरक्षिततेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अखेरीस मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षकांकडून अशोका समूहाची ‘गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याची घोषणा करण्यात आली.यावेळी या उपक्रमासाठी ग्रिनीज बुक आॅफ रेकॉर्डचे परीक्षक स्वप्नील डिंग्रीकर आणि सुधीर कुलकर्णी, डॉ. वासुदेव झांबरे यांनी या आधी नोंदवण्यात आलेला २१६८ सहभाग धारकांची नोंद मोडीत काढत २ हजार ७०० सहभाग धारकांच्या नोंदीने हे नवीन रेकॉर्ड नोंदवण्यात आल्याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक अशोक कटारिया, व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख, आशिष कटारिया, आदित्य पारख, आशा कटारिया, आस्था कटारिया यांच्यासह पोलीस प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्योम श्रीवास्तव यांनी केले. (प्रतिनिधी)