शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांची कामगार उपायुक्तांकडे धाव

By admin | Updated: March 11, 2017 23:24 IST

नाशिक : क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार कंपनीतील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी कामगार उपआयुक्तांकडे केली

नाशिक : क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार कंपनीतील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी कामगार उपआयुक्तांकडे केली असून, कंपनीच्या वर्तणुकीमुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन कधीही त्याचा स्फोट होऊ शकतो, असा इशारा त्यात देण्यात आला आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात कामगारांनी म्हटले आहे की, क्रॉम्प्टन कंपनीत आयटक युनियनचे कामगारांनी सभासदत्व घ्यावे यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर दबाव टाकला जात असून, २०१५ पासूनचा पगारवाढीचा करार बहुमत असलेल्या युनियनसोबत करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे.  प्रस्थापित युनियन व व्यवस्थापन सेवा निवृत्त होणाऱ्या कामगारांना आर्थिक नुकसान करून घेत असल्याचे सांगून इच्छा नसतानाही जबरदस्तीने आयटक युनियनचे सभासदत्व स्वीकारावे यासाठी दबाब टाकत आहे. कंपनीच्या बेकायदेशीर कृत्याच्या विरोधात ११ मे २०१५ रोजी कामगारांनी कायदेशीररीत्या सूचना देऊन संप केला असतानाही तो बेकायदेशीर असल्याचे ठरवून अठरा कामगारांना निलंबित करण्यात आले. असे निलंबन करताना चुकीच्या पद्धतीने कामगारांना गोवण्यात आले व त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.  कंपनीकडून सुरू असलेला मानसिक छळ पाहता वेळोवेळी कामगार उपआयुक्त कार्यालयात तक्रार करूनही उपयोग न होता, उलटपक्षी कामगारांवर दिवसेंदिवस अन्याय होत असल्याने त्यांचे कुटुंब त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत कंपनीने निलंबित केलेल्या वा बडतर्फ केलेल्या कामगाराने जिवाचे बरे-वाईट केले तर त्याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापन व आयटक युनियनवर राहील, असेही या तक्रारीत म्हटले आहे. या निवेदनावर चंद्रकांत गुरव, सोबू नायडू, शरद पाटील, सोमनाथ जाधव, दिलीप चिते, प्रकाश देशमुख, मोरेश्वर पिंगळे, वाळू भोर, प्रकाश कदम, प्रदीप निंबाळकर यांच्यासह तीनशेहून अधिक कर्मचाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)