शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा मोर्चा

By admin | Updated: February 23, 2016 23:31 IST

चिचोंडी खुर्द : विहिरीने तळ गाठल्याने पाण्यासाठी भटकंती

 येवला : तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढला.चिचोंडी खुर्द येथील सार्वजनिक विहीर व आडाने तळ गाठल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महिलांनी आक्रमक होत थेट ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा नेला. एक तास ठिय्या आंदोलन करत टँकर सुरू करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. यावेळी सरपंच कल्पना जाधव, ग्रामसेवक सी. डी. बोरसे यांना निवेदन देण्यात आले. टँकर मागणीचा ठराव पंधरा दिवसांपूर्वीच वरिष्ठांना पाठवला असून, प्रस्तावावर वरिष्ठांची सही न झाल्याने टँकर सुरू झाला नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने महिलांनी संतप्त होत आपला मोर्चा येवला तहसील कार्यालय व पंचायत समितीवर नेला. यावेळी सरपंच कल्पना जाधव, ग्रामसेवक सी. डी. बोरसे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर चंद्रभागा मढवई, सुंदरबाई सोनवणे, प्रमिला राजगुरू, सुमन मढवई, लहानूबाई मढवई, परवीन शेख, अलका मढवई, सविता राजगुरु, सुनीता राजगुरु, सुशीला कुलकर्णी, रिजवाना पठाण, संगीता जोशी, लंकाबाई गोसावी, मनीषा चव्हाण, छाया धाकतोडे, उषा राजगुरू, कुलसबी शेख, हेमवती वाडेकर, जरीना शेख, बेबी मढवई, संगीता सोनवणे, कविता मढवई, सुनीता गायकवाड, हिराबाई गोसावी, किशाबाई पवार, अरुणा पवार, फरजाना शेख, बिस्मिल्ला शेख, मंगल मढवई, रेवती कासलीवाल, शमीना शेख, रोहिणी मढवई, जया धाकतोडे, कल्पना धाकतोडे, सुमन पवार, संतोष मढवई, सुनील कासलीवाल, विठ्ठल पळे, दत्ता जाधव आदिंच्या सह्या आहेत. (वार्ताहर)पथदीपांभोवतीच्या वृक्ष फांद्या छाटणीची मागणीनाशिक : शहरात ठिकठिकाणी पथदीपांभोवती वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची मागणी दक्षता अभियानचे संचालक आणि नगरसेवक विक्रांत मते यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, शहरात ठिकठिकाणी पथदीपांभोवताली वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याची मागणी वारंवार केली जात आहे, परंतु उद्यान निरीक्षकांकडून ट्री अ‍ॅक्टमधील कलमांचा आधार घेऊन वृक्ष छाटणीबाबत टाळाटाळ केली जात आहे. उद्यान निरीक्षकांकडून सदर कलमांचा अर्थ आपल्या सोयीनुसार आणि कामाची जबाबदारी टाळण्याकरिता घेतला जात आहे. (प्रतिनिधी)