पंचवटी : आडगाव शिवारातील ओढा परिसरात राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेने राहत्या घरात आजारपणाला कंटाळून आढ्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लीलाबाई संपत सहाणे असे या महिलेचे नाव असून, त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मंगळवारी सकाळी घरात कोणी नसताना त्यांनी राहत्या घरात आजारपणाला कंटाळून आत्महत्त्या केली. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}