शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी उपमहापौर आता पदाचे राजीनामे देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : भाजपात स्वतःबरोबरच कुटुंबात सत्ता पदे घेणारे वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या पक्षांतरामुळे आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : भाजपात स्वतःबरोबरच कुटुंबात सत्ता पदे घेणारे वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या पक्षांतरामुळे आता आजी-माजी उपमहापौर राजीनामे देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर या नेत्यांच्या बळावर नगरसेवक पदाची उमेदवारी पदरात पाडून घेणारे त्यांचे समर्थकसुद्धा आपल्या नेत्यांचे समर्थन करणार की आपले पद वाचविण्यासाठी भाजपला चिकटून राहणार, या विषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आपापले पक्ष सोडून वसंत गीते आणि सुनील बागुल हे दोघेही भाजपमध्ये दाखल झाले. दोघेही खरे तर मूलतः शिवसैनिकच. परंतु नंतर दोघेही अनुक्रमे मनसे आणि राष्ट्रवादी या पक्षात गेले आणि नंतर तेथून भाजपात आले. भाजपने दोघांनाही प्रदेश पातळीवर पदे दिलीच, शिवाय त्यांच्या समर्थकांनादेखील २०१७ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत तिकिटे दिली. त्यातील अनेक जण निवडून आले. गीते यांचे पुत्र प्रथमेश आणि सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागूल यांनाही उमेदवारी दिली. शिवाय पक्षातील जुन्या निष्ठावानांना डावलून त्यांना उपमहापौरपदेही दिली. मात्र आता एवढे करून या नेत्यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे उपमहापौर भिकूबाई बागुल आणि माजी उपमहापौर प्रथमेश गीते हे नैतिकता म्हणून राजीनामे देऊन शिवसेनेत प्रवेश करणार काय, असा प्रश्न आता केला जात आहे.

असाच प्रश्न आता गीते आणि बागुल यांच्या समर्थकांच्या बाबतीतदेखील आहे. ज्यांनी आपल्याला भाजपची उमेदवारी दिली, ते नेतेच भाजपात नसतील तर ते देखील भाजप नगरसेवकपदाचे राजीनामे देऊन शिवसेनेत सहभागी होणार का? की नगरसेवक पदाचा मोह त्यांना किमान निवडणुका जाहीर होईपर्यंत भाजपातच ठेवणार असा प्रश्न केला जात आहे.

---इन्फो----

भाजपची अगतिकता

अन्य पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे समर्थन करणारे किंवा त्यांचे समर्थक म्हणून पदे मिळणाऱ्यावर भाजपचे नेते कारवाई करण्याच्या तयारीत नाही. दोघे नेते पक्षांतर करत असल्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात असताना पक्षाचे नवे महानगर प्रमुख किंवा संघटन मंत्रीदेखील नाशकात येऊन डॅमेज कंट्रोल करू शकले नाही. त्यामुळे भाजपाची अगतिकता आणि दुर्बलतादेखील दिसत आहे. भाजयुमोचे शहराध्यक्षपद सुनील बागुल यांचे पुत्र मनीष यांच्याकडे असून सुनील बागुल यांनी पक्ष सोडून जाऊ नये यासाठी त्यांना हे पद देण्यात आले होते. त्याबाबत देखील पक्ष काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागून आहे.