शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेल भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

का आत्ताच पराभव दिसू लागला?

By admin | Updated: January 7, 2017 00:56 IST

‘नाशिककर मते देणार नसतील तर कोण येथे येईल’

नाशिक : नाशिकमध्ये इतकी विकासकामे करूनही जर नाशिककर मतदान करणार नसतील तर कोण कशाला येथे पुन्हा येईल? असा सवाल करून नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिककरच नव्हे तर स्वपक्षातील निवडणूक इच्छुकांना पराभूत मानसिक गर्तेत लोटून निवडणुकीपूर्वीच स्वत:चा पराभवही मान्य केल्याचा अर्थ त्यातून काढला जात आहे. मुळात राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये येऊन येथील जनतेचे प्रतिनिधित्व करावे, असा आग्रह त्यांना कोणी व कधी धरल्याचे ऐकिवात नसले तरी, गेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका करीत, ‘एकदा सत्ता द्या, कसा सुतासारखा सरळ करतो’ अशी भीमगर्जना करणाऱ्या ठाकरे यांचे निराशाजनक वक्तव्य पाहता त्यांना पाच वर्षांनंतरही सूत सरळ करता आले नाही हेदेखील स्पष्ट झाले आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाच वर्षे केली नाहीत इतकी लोकार्पणे करण्यास सुरुवात केली व त्यासाठी खुद्द राज ठाकरे यांनाच नाशिक वाऱ्या कराव्या लागल्या आहेत. नाशिककरांनी सत्ता ताब्यात दिल्यावर मुक्कामी राहून नाशिकचा विकास करू, असे आश्वासन देणाऱ्या ठाकरे यांना सत्ताप्राप्तीनंतर नाशिककरांचा तसा विसरच पडला, त्यामुळेच की काय त्यांच्याच नावाने व करिष्म्याने निवडून आलेल्या ४० पैकी २६ नगरसेवकांनी त्यांची साथ सोडून अन्यत्र घरोबा केला.
निवडणुकीच्या तोंडावर मनसेला एकामागोमाग बसत असलेल्या धक्क्यातून पक्ष कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच खासगी विकासकांच्या मदतीने साकारण्यात आलेल्या कामांचे लोकार्पण करण्याच्या निमित्ताने ठाकरे यांना पुन्हा नाशिकची आठवण आली. नाशिकमध्ये विकासकामे करूनही मतदार मतदान करणार नसतील तर कशाला येथे यायचे, असा प्रश्न त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना करून स्वत:च राजकीय भवितव्याविषयी साशंक असल्याचे दाखवून दिले आहे. अर्थातच ठाकरे यांनी कोणत्या एजन्सीमार्फत सर्व्हे केला की ज्योतिषाकडे हात दाखवून (तसा त्यांचा ज्योतिषावर विश्वास नसल्याचे त्यांनी जाहीर केले, परंतु हातात रंगीबेरंगी अंगठ्या कायम ठेवल्या) निष्कर्ष काढला हे समजू शकले नसले तरी, मनसेत जी थोडीफार धुगधुगी असल्याचे समजून ज्यांनी आगामी महापालिका निवडणुकीची तयारी चालविली त्यांच्या मात्र छातीत धस्स झाले.
पक्षप्रमुखालाच खात्री नसेल तर उमेदवाराला ती कशी असेल असा साहजिकच पडणारा प्रश्नही त्यातून निर्माण झाला आहे. एकमात्र खरे ज्यांनी राजकीय हवा पाहून मनसेतून काढता पाय घेतला त्या पदाधिकारी व नगरसेवकांना मात्र ‘बरे झाले बाहेर पडलो’ याचा आनंद ठाकरे यांच्या उपरोक्त विधानावरून झाला आहे. परंतु जे मनसेतून गेले ते नंतर पश्चाताप करतील हे ठाकरे यांचे दुसरे विधानही काहीसे चक्रात टाकणारे असून, जर नागरिक मतदानच करणार नाही असा ठाकरे यांचा होरा असेल तर पक्ष सोडून गेलेल्यांना त्यांचा आनंद वाटावा की पश्चाताप? अर्थातच ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार पक्ष सोडणाऱ्यांना पश्चाताप होणार असेल तर त्यामागे एकतर त्यांना मनसेकडून उमेदवारी घेऊन पराभवाची चव चाखावी लागणार नाही, असे ठाकरे यांना म्हणावयाचे असेल किंवा इतकी पडझड होवूनही नाशिककर पुन्हा आपल्याच बाजूने कौल देतील, अशी भोळी आशा ठाकरे यांनी बाळगली असेल.