शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

कुणी सौर दिवा घेतं का दिवा? मक्तेदाराची गावोगावी पायपीट

By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST

१४ वा वित्त आयोग : आदर्श सरपंचाचा गौप्यस्फोट

नाशिक : वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर या निधीतून खिसे भरण्यासाठी काही मक्तेदार आतूर झाले असून, असाच एक मक्तेदार गावोगावी फिरून १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावांनी सौर पथदीप ‘खरेदी’ करावेत, यासाठी झोळी घेऊन फिरत आहे. बदल्यात सरपंच आणि ग्रामसेवकांचे खिसे भरण्याचे आश्वासन देत असल्याचा गौप्यस्फोट किकवारी खुर्दचे आदर्श सरपंच पुरस्कार विजेते विद्यमान उपसरपंच केदा बापू काकुस्ते यांनी केला.शनिवारी (दि. २३) नाशिकच्या सरपंच व ग्रामसेवकांच्या कार्यक्रमात व्यासपीठावरूनच अनुभव सांगताना केदा बापू काकुस्ते यांनी वरील गोष्टींचा उलगडा केला. गावच्या विकासासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतले. तरीही काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे जेव्हा गावाला मान खाली घालावी लागते, तो क्षण खूपच वेदनादायी असल्याचे काकुस्ते यांनी सांगितले. आताच्या केंद्र सरकारचा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वितरित केल्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील या निधीतून कंत्राटे घेणाऱ्या मक्तेदारांची चांगलीच गोची झाली आहे. म्हणूनच की काय, आता गावोगावी हे मक्तेदार फिरून गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना आमिष दाखवित सुटले आहेत. आपल्याकडेही काही दिवसांपूर्वीच एका चारचाकीतून एक मक्तेदार आला. वित्त आयोगाचा निधी तुमच्या ग्रामपंचायतीकडे वर्ग झाला आहे. आता त्या निधीतून काय करायचे हे तुम्ही ठरविले आहे काय? त्या निधीतून गावात सौर पथदीप घ्या, तुमचे आणि भाऊसाहेबांचे काय असेल ते पाहून घेऊ, असे या महाशयांनी सांगताच आपला संताप अनावर होऊन आपण पाणी न विचारता त्या मक्तेदाराला आल्या पावली परत पाठविले. त्यावेळी त्याच्या श्रीमुखात भडकावण्याइतका आपला संताप झाला होता, असे त्यांनी सांगताच उपस्थित ग्रामसेवक व सरपंंचांमध्ये हशा पिकला. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाचे दुरुस्तीविषयक काम करणारा एक मक्तेदार असाच गावोगावी फिरून सौर पथदीप पुरवठ्यासाठी प्रस्ताव गोळा करीत असल्याची जिल्हा परिषदेत आदर्श ग्रामपंचायतीच्या एकेकाळी आदर्श सरपंच पुरस्कार मिळविलेल्या उपसरपंचानेच याचा खुलासा केल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)