शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या लढतीत वर्चस्व कोणाचे?

By admin | Updated: November 18, 2016 22:40 IST

अटीतटीच्या लढतीत वर्चस्व कोणाचे?

भगूर : येथील प्रभाग ५ ब हा जनरल असून, येथे तिरंगी लढत होणार आहे. कोण कोणत्या समाजाची मते आपल्याकडे जास्त खेचतो यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. येथून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मोहन करंजकर, शिवसेनेकडून संतोष ओहोळ आणि भाजपाच्या वतीने युनुस शेख आपले नशीब आजमावत आहेत. यातील मोहन भिकाजी करंजकर हे पदवीधर असून, विद्यमान भगूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष असून, मुरब्बी राजकारणी आणि समाजसेवक आहेत. ते श्रीदत्त मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून, त्यांनी महिला-पुरुषांच्या आरोग्याविषयी अनेक शिबिरे घेऊन अनेकांना मदत केली आहे. मागील निवडणुकीत थोड्याच मताने निसटता पराभव झाला होता. त्यांची मराठा, दलित, आदिवासी मतदारांवर जास्त पकड असून, त्यांचे चुलते भगूरचे जनतेतून प्रथम नगराध्यक्ष निवडून आलेले पां. भा. करंजकर यांचे येथे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय वारसाने मोहन करंजकर उभे असून, प्रचारात आघाडीवर आहेत.संतोष ओहोळ हे शिवसेनेचे कार्यकर्ते असून, धनगर समाजात त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यांच्या नात्यागोत्यात मोठ्या प्रमाणावर मतदार वर्ग आहे. सर्व जातिधर्मात त्यांचे उठणे बसणे असून, ते पण शिक्षित आहेत. तसा त्यांना राजकीय वारसा नसला तरी या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते सामाजिक काम करतात. येथे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना विशेष मानणारा वर्ग असल्याने उमेदवार जरी राजकारणी नाही तरी पण शिवसेनेच्या प्रयत्नामुळे येथून संतोष ओहोळ यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. (वार्ताहर)