बसमध्ये चढताना महिलेची चार तोळ्याची पोत लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST2021-03-08T04:14:52+5:302021-03-08T04:14:52+5:30

नाशिक : ठक्कर बाजार बस स्टँडवर बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लांबविल्याची घटना घडली ...

While boarding the bus, the woman carried a four-pound vessel | बसमध्ये चढताना महिलेची चार तोळ्याची पोत लांबवली

बसमध्ये चढताना महिलेची चार तोळ्याची पोत लांबवली

नाशिक : ठक्कर बाजार बस स्टँडवर बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लांबविल्याची घटना घडली असून चोरट्यांनी पर्ससोबत चार तोळ्याची सोन्याची पोत व ६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावच्या अंमळनेर येथील वैशाली संजय सोनार यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात पर्स चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैशाली सोनार शनिवारी (दि. ६) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ठक्कर बस स्टॅँड येथे चोपडाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील ४ तोळे वजनाची १ लाख ६६ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व ६ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: While boarding the bus, the woman carried a four-pound vessel